… तर इराणचे अस्तित्वच मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर जगभरात खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखातातील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली असून अमेरिका आणि इराण आमनेसामने आले आहेत. जर अमेरिकेला लष्करी कारवाई करण्यास भाग पाडले, तर इराणचे अस्तित्वच नष्ट होईल, असा थेट इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. शनिवारी अमेरिकेने इराणमधील 10 महत्त्वाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात रविवारी इराणने कुवेत आणि बहारीनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे मोठे हल्ले केले असून. त्यामुळे आखातात पुन्हा एकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पनामाचा ध्वज असलेल्या M/T Kiku या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर संघर्षाची ठिणगी पडली आहे. हे जहाज 20 लाख बॅरलहून अधिक कच्चे तेल वाहून नेत असताना इराणच्या आत्मघाती ड्रोनने या जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार युएस सेंट्रल कमांड’ने इराणमधील संशयास्पद तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. व्यावसायिक जहाजांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने सलग दुसऱ्या दिवशी ही लष्करी कारवाई केली आहे. या हल्ल्यांमध्ये दक्षिण इराणमधील सिरीक बेट आणि केशम बेटावरील एका गावाला लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे.

अमेरिकेच्या कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल एक पोस्ट लिहून इराणला थेट धमकी दिली आहे.युद्धबंदी कराराचे पुन्हा एकदा उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकन विमानांनी नुकतेच इराणचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवणूक तळ, तसेच किनारी रडार केंद्रांवर जोरदार हल्ले केले आहेत. इराण कधीच सुधारणार नाही हे आता स्पष्ट होत चालले आहे! एक वेळ अशी येईल जेव्हा आमच्या सहनशीलतेचा अंत होईल आणि आम्ही लष्करी ताकदीचा वापर करून हे काम कायमचे संपवून टाकू. जर असे घडले, तर जगात ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’चे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही! अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे.

कुवेतमध्ये आणीबाणी

एअर डिफेन्स सिस्टीमने शत्रूचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले परतवून लावत आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कुवेतच्या लष्कराने दिलेली आहे. तर दुसरीकडे बहारीनमध्ये जिथे अमेरिकेचा मोठा नौदल तळ आहे, तिथे हवेत विमाने फिरत असून हवाई हल्ल्यांचे सायरन वाजत आहेत. नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सुरक्षित आश्रयस्थळांकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नरक यातना भोगाव्या लागतील; अमेरिका आणि आखाती देशांना इराणचा थेट इशारा, कुवेत-बहरीनमधील लष्करी तळांवर हल्ला

Comments are closed.