गणपतीपुळ्यात आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ’रोबोटिक वॉटर रेस्क्यू’ प्रणाली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे समुद्रकिनारा येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता अत्याधुनिक रोबोटिक आपत्ती वॉटर क्राफ्ट यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे सादर केला आहे.

मागील आठवडय़ात गणपतीपुळे येथे छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने समुद्रातील बचावकार्यासाठी अत्याधुनिक रोबोटिक यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. परंतु, भरती-ओहोटी, समुद्रातील अचानक बदलणारे प्रवाह, पाण्याचा वेग आणि निष्काळजीपणामुळे दरवर्षी बुडण्याच्या दुर्घटना घडतात. अशा परिस्थितीत रोबोटिक वॉटर रेस्क्यू प्रणाली जीवितहानी टाळण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. ही यंत्रणा रिमोटद्वारे नियंत्रित केली जाते. समुद्रात एखादी व्यक्ती बुडत असल्याचे निदर्शनास येताच हा रोबोट काही सेकंदांत संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचून तिला सुरक्षितपणे किनाऱयावर आणण्यास सक्षम आहे.

n या रोबोटची वहन क्षमता एका प्रौढ व्यक्तीचे वजन सहज पेलण्याइतकी आहे. हा रोबोट बुडणाऱया व्यक्तीपर्यंत काही सेकंदांत पोहोचून तिला सुरक्षितपणे किनाऱयावर आणू शकतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही यंत्रणा अत्यंत महत्त्वाची ठरेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले.

Comments are closed.