मुख्यमंत्री कुठे आहेत?
मणिपूरच्या आमदारांसोबत गृहमंत्र्यांची बैठक : काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित
टी न्यूज एजन्सी, इंफाळ
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरच्या नागा समुदायाच्या आमदारांसोबत बैठक घेतली आहे, या बैठकीत नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो उपस्थित होते, परंतु या बैठकीनंतर अनेक कयास वर्तविले जाऊ लागल्यावर काँग्रेसने अखेर आमदार आणि गृहमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह उपस्थित का नव्हते असा प्रश्न उपस्थित केला आहे. मणिपूरमधील नागा आमदार आणि गृहमंत्री शाह यांच्यातील बैठक मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशिवाय कशी आयोजित होऊ शकते असा सवाल काँग्रेसने केला आहे.
या बैठकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील मणिपूर सरकारच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. आमदार आणि केंद्रीय गृहमंत्र्यांदरम्यान बैठकीतून मुख्यमंत्र्यांना दूर ठेवणे हे पदाची प्रतिष्ठा आणि त्यांच्या अधिकाराला कमी लेखणे असल्याचे मणिपूरच्या काँग्रेस विधिमंडळ गटाचे नेते केशम मेघचंद्र सिंह यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचलेले उपमुख्यमंत्री लोसी दीखो यांच्यावर टीका केली आहे.
आमदारांना मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही
उपमुख्यमंत्री लोसी दीखो आणि नागा आमदारांना स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसल्याचे या बैठकीतून स्पष्ट होते. याचमुळे ते मुख्यमंत्र्यांशिवाय थेट नागा आमदारांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. राज्याचेप dरशासन राज्याच्या निर्वाचित प्रतिनिधींच्या माध्यमातून व्हायला हवे. शेजारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मणिपूरच्या आमदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व का करण्यात आले असे प्रश्नार्थक विधान काँग्रेसच्या नेत्याने केले आहे.
दुसरे उपमुख्यमंत्री लक्ष्य
राज्यात पुरेशी सुरक्षा असतानाही उपमुख्यमंत्री नेमचा किपगेन हे दिल्लीत राहत असल्याने त्यांची प्राथमिकता काय हे दिसून येते. उपमुख्यमंत्री राज्याचे नवे तर राष्ट्रीय राजकरण करू इच्छितात. राज्याचे मुख्यमंत्री युमनाम हे केवळ कागदी वाघ असून राज्याच्या प्रशासनावरील त्यांचा प्रभाव संपला असल्याचा दावा काँग्रेस नेते मेघचंद्र यांनी केला आहे.
Comments are closed.