टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध मालिका का गमावली? असिस्टंट कोच म्हणाले, “आम्ही परिस्थितीशी जुळवून…”
भारताचा आयर्लंड दौरा क्रिकेट रसिकांच्या सदैव लक्षात राहिल. या दौऱ्यात भारताने दोन्ही टी२० सामने गमावले आणि यजमान संघाने ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. या मालिकेत भारताची कामगिरी निराशाजनक झाली. असे का झाले, याबाबत भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी कबूल केले आहे की, आयर्लंडविरुद्धच्या टी २० मालिकेत भारतीय संघ परिस्थितीचा अंदाज घेण्यास आणि तिच्याशी जुळवून घेण्यात अपयशी ठरला.
विश्वविजेत्या टी२० संघाने आयर्लंडविरुद्ध केवळ एकच सामना गमावला नाही, तर संपूर्ण मालिकाच गमावली. जेव्हा भारताने २६ जूनला खेळलेला पहिला सामना ३४ धावांनी गमावला होता, तेव्हा वाटले भारताचा दिवस चांगला नव्हता. या मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने दुसऱ्या सामन्यातही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली. दुसरा सामना भारताने केवळ एका धावेने गमावला. त्यामुळे संघावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
दुसऱ्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डोशेट म्हणाला, “आमच्यासह अनेक लोकांना यावर विश्वासच बसत नाही. आम्ही नुकताच विश्वचषक जिंकला आहे, मात्र मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संघाने आम्हाला हरवले. सर्वप्रथम आयर्लंडचे कौतुक करायला हवे आणि दुसरे म्हणजे, आमच्यासाठी सर्वात मोठा धडा असा की आम्ही वेगवेगळ्या परिस्थितींशी आणि वेगवेगळ्या संघांशी कसे जुळवून घेऊ शकतो, हे शिकणे.”
माझ्या मते, या मालिकेत परिस्थितीने महत्त्वाची भुमिका बजावली. आमच्या पराभवाचे तेच मुख्य कारण आहे. आम्ही ती परिस्थिती नीट हाताळू शकलो नाही. सर्वात मोठी समस्या वाऱ्याची होती, मात्र पराभवाला कोणतेही कारण देता येणार नाही. आम्हाला वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. आयर्लंडने चांगली कामगिरी केली. आम्हाला आक्रमक फलंदाजी करायला आवडते, मात्र अशा परिस्थितीत आम्हाला अधिक हुशारीने खेळण्याची आवश्यकता आहे, असेही डोशेट यांनी पुढे म्हटले आहे.
या मालिकेत खेळण्याआधी भारताने आयर्लंडविरुद्ध एकही सामना गमावला नव्हता, मात्र अवघ्या तीन दिवसांतच भारताने आयर्लंडविरुद्ध पहिला सामना गमावला आणि त्यानंतर मालिकाही गमावली. या कामगिरीमुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची सुरूवात वाईट झाल्याचे दिसते. भारताने याचवर्षी मार्चमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी२० विश्वचषक जिंकला होता, पण आता आयर्लंडकडून पराभूत व्हावे लागले. ज्यांनी विश्वचषक २०२६ मध्ये उत्तम कामगिरी केली होती, त्या भारतीय खेळाडूंना आयर्लंड मालिकेत त्याची पुनरावृत्ती करता आली नाही.
भारत जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. त्यासाठी हाच संघ असून तेथे भारत कसा कामगिरी करतो, याकडे लक्ष असेल.
Comments are closed.