केतनला माहिती नसताना बॉयफ्रेंड चेतनसोबत सिया उदयपूरला का गेली होती? सियाच्या आईचा खुलासा, म्हणा
Pune Ketan Agarwal Murder Case : लोहगड किल्ल्यावरील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाचा (Ketan Agarwal Death Case) तपास करत असताना रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सोशल मीडियावर सध्या मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचे राजस्थानमधील मेहरानगड किल्ला (जोधपूर) आणि उदयपूर येथील काही फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत. अशातच समोर आलेल्या माहितीनुसार, हत्याकांडाच्या (Ketan Agarwal Death Case) एक महिना आधी, सिया मे 2026 मध्ये कथितरित्या चेतनला उदयपूरला घेऊन गेली, जिथं नोव्हेंबरमध्ये तिचं आणि केतन अग्रवालचं लग्न होणार होतं, अशी माहिती रिपोर्टनुसार समोर आली होती. अशातच आता या प्रकरणावर सियाच्या आईने खुलासा केला आहे.(Ketan Agarwal Death Case)
या फोटोंवरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, आता सियाच्या आईने या दौऱ्यामागील सत्य सांगत एक मोठा खुलासा केला आहे. “सिया चेतनसोबत उदयपूरला गेली होती आणि ‘चेतन’ नावाचा मुलगा माझा मित्र आहे, याची पूर्वकल्पना तिने स्वतः केतनला दिली होती,” अशी माहिती सियाच्या आईने दिली आहे.(Ketan Agarwal Death Case)
केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण: सिया आणि चेतन उदयपुरला यांचा मृत्यू?
हत्याकांडाच्या एक महिना आधी म्हणजेच मे महिन्यात केतनला अंधारात ठेऊन सिया उदयपूरला गेली होती, तिथं चेतन देखील होता. त्याचे काही फोटो देखील समोर आले होते. सिया आणि चेतन उदयपूरला का गेले होते? तुम्हाला याबद्दल माहिती होती का? असा सवाल जेव्हा सियाच्या आईला विचारला गेला, तेव्हा सियाच्या आईने मोठा खुलासा केला आहे. उदयपूरमध्ये सियाच्या फ्रेंडचं लग्न होतं, त्यामुळे सिया तिथं गेली होती. तिथंच तिला चेतन भेटला होता, असं सियाच्या आईने म्हटलं आहे. सिया आणि चेतन एकत्र गेले नव्हते, असंही त्या म्हणाल्या. एवढंच नाही तर केतनला चेतनबद्दलची माहिती होती. केतनला सियाने सांगितलं होतं की, चेतन म्हणून माझा एक मित्र आहे, असंही सियाच्या आईने सांगितलं आहे.
Ketan Agarwal Death Case : केतनला आधीच दिली होती चेतनची माहिती!
“या दौऱ्याची माहिती तुम्हाला किंवा केतनला होती का?” या प्रश्नावर उत्तर देताना सियाच्या आईने सांगितले, “सियाने केतनपासून काहीही लपवले नव्हते. तिने स्वतः केतनला स्पष्टपणे सांगितले होते की, माझा चेतन नावाचा एक मित्र आहे. मार्केट यार्डमधील क्रिकेट मॅच आणि त्यानंतर राजस्थान दौऱ्यापर्यंत ते दोघे केवळ मित्र म्हणून सोबत होते, त्यांच्यात गंभीर प्रेमसंबंध (रिलरशिप) सुरू आहे, अशी पुसटशीही शंका आम्हाला कधी आली नाही, असेही तिच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
Ketan Agarwal Death Case : कस्टडीत बिअर मागितल्याची चर्चा केवळ अफवा!
“पोलीस कोठडीत सियाने पोलिसांकडे बिअर किंवा दारूची मागणी केली,” अशा चर्चा माध्यमांमध्ये रंगत आहेत. यावर बोलताना सियाच्या आईने सांगितले की, “काल जेव्हा मी पोलिसांना स्टेटमेंट देण्यासाठी गेले होते, तेव्हा मी स्वतः पोलिसांना याबाबत विचारले. पोलिसांनी मला स्पष्ट सांगितले की, तुमच्या मुलीने आमच्याकडे कोणतीही बिअर किंवा दारू मागितलेली नाही. या सर्व केवळ प्रसारमाध्यमांवर येत असलेल्या अफवा आहेत. तिला असल्या कुठल्याही पार्ट्या किंवा बिअर पिण्याची सवय नाही.”
Ketan Agarwal Death Case : सिया १२ वी नापास; घरूनच करायची केकचा बिझनेस!
सियाच्या शिक्षणाबाबत मोठा खुलासा करताना तिच्या आईने सांगितले की, “सियाचे शिक्षण खूप कमी आहे, ती १२ वी देखील पास नाही. ही गोष्ट मी आधीच केतनच्या आईला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला स्पष्टपणे सांगून दिली होती की, सियाला अभ्यासात अजिबात रस नाही. म्हणूनच तिने घरूनच केक बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला होता. जेव्हा तिच्या ओळखीतील कझिन ब्रदर्स, सिस्टर्स किंवा मित्रांचे फोन यायचे, तेव्हा ती घरूनच बर्थडे केक बनवून द्यायची. यामुळे तिचा टाईमपासही व्हायचा आणि स्वतःच्या खर्चासाठी दोन पैसे मिळायचे.”
Ketan Agarwal Death Case : “आधी माहित असतं तर लालाजींची हात जोडून माफी मागितली असती!”
“मुलगी आईच्या जास्त जवळ असते, मग तिने कधीच चेतनबद्दल सांगितले नाही का?” या प्रश्नावर भावूक होत आईने सांगितले, “तिने मला कधीच सांगितले नाही की, तिचे केतनवर प्रेम नाही या मला लग्न करायचे नाही, अथवा तिच्या आयुष्यात दुसरा कोणी मुलगा आहे. जर तिने मला याबद्दल जरा जरी कल्पना दिली असती, तर मी अग्रवाल कुटुंबासमोर हा प्रस्ताव ठेवला असता की, मुलांमध्ये जमत नाही आणि लग्न थांबवले असते.”
सियाच्या वडिलांनी देखील यावर तीव्र खंत व्यक्त केली. ते म्हणाले, “जर आम्हाला या प्रेमसंबंधांबद्दल आधी काही माहिती असती, तर आम्ही काहीतरी पाऊल उचलले असते. मी स्वतः केतनच्या वडिलांकडे (लालाजींकडे) गेलो असतो आणि हात जोडून त्यांची माफी मागितली असती. त्यांच्याशी चर्चा करून यातून काहीतरी मार्ग किंवा तोडगा काढला असता आणि हा विषय तिथेच संपवला असता. पण तिने आम्हा कोणालाच काही सांगितले नाही.”
Ketan Agarwal Death Case : “दोषी असेल तर तात्काळ फाशी द्या!”
“उद्या जर न्यायालयाने कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारे सियाला दोषी ठरवले, तर एक आई आणि भारतीय नागरिक म्हणून तुमची काय भूमिका असेल?” या प्रश्नावर उत्तर देत सियाच्या आईने म्हटले, “मी कायद्याचास सन्मान करते. जर माझी मुलगी या हत्येमध्ये दोषी सिद्ध झाली, तर या केसचा खटला जलद गतीने चालवून तिला तात्काळ फाशीची शिक्षा सुनावली जावी, हेच माझे मागणे असेल.”
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.