सरकार कोणाला घाबरतय? महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरील उच्चधिकार समितीची बैठक रद्द केल्यानंतर संजय राऊत यांचा सवाल
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चधिकार समितीची बैठक 30 जून रोजी होणार होती. मात्र 29 जून रोजी सरकारने ही बैठक रद्द केली. त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
”ही बैठक रद्द करण्याच्या आदेशावरून फडणवीस मिंधे सरकार महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत किती गंभीर आहे ते दिसून येतंय. मराठी माणूस,भाषा,संस्कृती बाबत सरकारची अनास्था चिंताजनक आहे. हे सरकार कोणाला घाबरत आहे?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Comments are closed.