Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचा 'हिट', ठाकरे 'चिंतक' | स्पेशल रिपोर्ट
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचा 'हिट', ठाकरे 'चिंतक' | स्पेशल रिपोर्ट
ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या. ठाकरेंच्या या दौऱ्यात त्यांनी फुटीर खासदारांवर केलेली टीका जितकी गाजली, त्यापेक्षाही जास्त चर्चा रंगलीय ती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यांची. खासदार फोडण्याच्या या प्रक्रियेला ऑपरेशन टायगर म्हणण्याऐवजी ऑपरेशन देवेंद्र म्हणायला हवं, असं सांगत त्यांनी या प्रक्रियेला वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न केलाय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते, हे मी तुम्हाला उदाहरणासह सांगितलं आहे. नितीन गडकरी, शिवराज सिंह चव्हाण यांची उदाहरणं दिली आहेत. जसं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देवा भाऊ म्हणतात, तसं शिवराज सिंह चव्हाण यांना मामा म्हणायचे. त्यांना वाटत होतं शिवराज मामा पंतप्रधान पदाचा चेहरा होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांना वरती दिल्लीत घेतलं. शिंदेंवर टीका करताना ठाकरे हे फडणवीसांचं कौतुक करू लागल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. नेमकं काय घडतंय, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून…
Comments are closed.