Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
मंडळी दरवर्षी जून महिन्याच्या शेवटी राज्यात जवळपास नव्वद टक्के पेरण्या झालेल्या असतात. पण, यंदा महाराष्ट्राचं चित्र फार भयाण आहे. कारण सुपर एल निनो… त्यामुळं जून महिना संपायला आला तरी राज्यात पाऊस झालेला नाही. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणायला पाऊस झाला. पण, तोही पुरेसा नाही. या परिस्थितीत राज्यात जेमतेम तीन टक्क्यांच्या आसपास पेरण्या झाल्यायत. मंडळी, आज जून महिना संपत असताना राज्यातल्या ३५५ पैकी तब्बल २२४ तालुक्यांमध्ये पाणीटंचाई आहे. इतकं भीषण चित्र असतानाच आज सकाळपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या आशा पल्लवित झाल्यायत.. आज सुरु झालेला पाऊस पुढचे काही दिवस सलग सुरु राहावा हीच अपेक्षा व्यक्त करून सुरु करुयात आजचा झीरो अवर..
Comments are closed.