15,000 लैंगिक गुन्हेगारांवर पोलिसांची नजर.
तामिळनाडू पोलिसांचा नवा पुढाकार : रंगश्रेणींच्या आधारावर होणार देखरेख
वृत्तसंस्था/ चेन्नई
लैंगिक गुन्हे रोखणे आणि पुन्हापुन्हा गुन्हे करणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवण्यासाठी तामिळनाडू पोलिसांनी एका नवा पुढाकार हाती घेतला आहे. आता सामूहिक बलात्काराचे आरोपी, वारंवार छेडछाड करणारे आणि सायबर लैंगिक गुन्हेगारांना एकाच श्रेणीत ठेवले जाणार नाही. राज्य पोलिसांनी ‘स्पेक्ट्रम’ नावाचा एक विशेष देखरेख प्रकल्प सुरू केला असून याच्या अंतर्गत सुमारे 15 हजार लैंगिक गुन्हेगारांची प्रोफाइल तयार करत त्यांच्या जोखिमीच्या आधारावर विविध श्रेणींमध्ये नजर ठेवण्यात येणार आहे. या पुढाकाराचा उद्देश गंभीर गुन्हेगारांची ओळख पटवत त्यांच्यावर सातत्याने नजर ठेवणे आहे.
राज्यातील दक्षिण क्षेत्राच्या 10 जिल्हयांमध्ये हा प्रकल्प लागू करण्यात आला आहे. यात मदुराई, तिरुनेलवेली, तूतिकोरिन आणि कन्याकुमारी यासारखे जिल्हे सामील आहेत. पोलिसांनुसार या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी 1500 ते 2000 लैंगिक गुन्हे नोंद होतात. यात छेडछाड, पाठलाग करणे, पॉक्सो कायद्यांतर्गत नोंद गुन्हे आणि बलात्कार यासारखे गुन्हे सामील आहेत. ‘स्पेक्ट्रम’चे पूर्ण नाव ‘सेक्सुअल ऑफेंडर प्रोफाइलिंग, इव्हॅल्युशन, क्लासिफिकेशन, ट्रॅकिंग, रिस्क असेसमेंट अँड यूनिफाइड मॉनिटरिंग सिस्टीम’ आहे.
काय आहे स्पेक्ट्रक प्रकल्प?
या प्रकल्पाच्या अंतर्गत लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपींना त्यांच्या गुन्ह्याचे गांभीर्य आणि पुन्हा गुन्हे करण्याच्या शक्तेच्या आधारावर विविध रंगांच्या श्रेणींमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. रेड आणि ऑरेंज श्रेणीच्या गुन्हेगारांवर सर्वाधिक नजर ठेवण्यात येणार आहे. या आरोपींच्या हालचाली, जामिनाची स्थिती आणि गुन्हेगरी पार्श्वभूमीची नियमित समीक्षा करण्यात येणार आहे. तर गरज भासल्यास अशा आरोपींकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 126 अंतर्गत बाँडही भरवून घेतला जाऊ शकतो असे पोलिसांनी सांगितले आहे.
कोणत्या गुन्हेगारांचा कुठल्या रंगाच्या श्रेणीत समावेश?
रंग कोड गुन्ह्dयाची श्रेणी
लाल (रेड) धोकादायक लैंगिक गुन्हेगार, सामूहिक गुन्हेगार
नारिंगी (ऑरेंज) वारंवार लैंगिक गुन्हे करणारे गुन्हेगार
निळा (ब्ल्यू) सायबर लैंगिक गुन्हेगार
काळा (ब्लॅक) संघटित गुन्हे, ज्यात मानवतस्करीसारखे गुन्हे सामील
सिल्वर किशोर गुन्हेगार
जांभळा (पर्पल) समलैंगिक गुन्हा
गुलाबी (पिंक) छेडछाड, शारीरिक संपर्काशिवाय लैंगिक गुन्हा
हिरवा (ग्रीन) कमी गंभीरता असणारे गुन्हे
बायोमेट्रिक डेटा
तामिळनाडू पोलिसांनी दक्षिण क्षेत्रात ‘मेजरमेंट कॅप्चरिंग यूनिट’ही (एमसीयू) सुरू पेले आहे. याच्या अंतर्गत आरोपींच्या हाताचे ठसे, आइरिस स्कॅन, उंची आणि हाय-रिझोल्युशनयुक्त छायाचित्रे मिळविली जात आहेत. यामुळे भविष्यात उकल न झालेल्या प्रकरणांचा तपास आणि गुन्हेगारांची ओळख पटविण्यास मदत होईल असे पोलिसांचे मानणे आहे. सायबर गुन्हेगारांचे मोबाइल फोन आणि सोशल मीडिया हालचालींवरही नजर ठेवली जातेय.
प्रकल्पामुळे काय साध्य होणार?
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पहिल्यांदा गुन्हे करणारे आणि कमी जोखिमयुक्त प्रकरणांच्या तुलनेत वारंवार आणि गंभीर गुन्हेगारांवर अधिक लक्ष देणे असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे. वारंवार गुन्हे करणारे गुन्हेगार किंवा समाजासाठी मोठा धोका ठरलेल्या गुन्हेगारांवर सातत्याने नजर ठेवण्यात येणार आहे. किशोरवयीन आरोपींप्रकरणी सुधार आणि सल्लामसलतीवर जोर देण्यात येईल, जेणेकरून त्यांना मुख्य प्रवाहात परत आणता येईल.
Comments are closed.