Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह

Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एक एक करून शिंदेंसोबत जात असताना राज्यामध्ये आणखी एका ऑपरेशनची चर्चा रंगली आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार देखील गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या दोन मतप्रवाह पाहायला मिळतात. एका गटाच असं म्हणण आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे तर दुसऱ्या गटाच असं म्हणण आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन झालो तर पक्ष फुटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आपण एनडीए सोबत पर्यायाने सत्तेसोबत गेलं पाहिजे. पक्ष एकसंध ठेवण्यासाठी हाच पर्याय योग्य आहे असं दुसऱ्या गटाच म्हणणं आहे. अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती. दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असते तर ते एनडीए सोबत राहिले असते की इंडिया सोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिलाय. आता एनडीए की काँग्रेस याबाबत पक्षात दोन मतप्रवाह असतील तर पक्षनेतृत्वासमोर ते मोठा आव्हान ठरेल. पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय घडतय बघूया या स्पेशल रिपोर्टमधून

Comments are closed.