नाशिक कुंभमेळ्यासाठी 34 हजार 732 कोटी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34 हजार 732 कोटी रुपयांची तरतूद केली असून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.  कुंभमेळ्यासाठी स्थापन केलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करणे, तसेच नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार देण्यात आल्याने या कामांसाठी स्वतंत्र डीपीआरची आवश्यकता नाही, असे सामंत म्हणाले. रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.