बंगालच्या हल्दिया रिफायनरीला भीषण आग लागली आहे.
35 कर्मचारी होरपळून जखमी
वृत्तसंस्था/ हल्दिया
पश्चिम बंगालच्या चिरंजीपूर क्षेत्रातील पेट्रोकेमिकल प्रकल्पात मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या घटनेत अनेक जण होरपळले गेले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. आगीमुळे अनेक घरं आणि दुकानं जळून खाक झाली आहेत. तसेच हल्दिया-पानस्कुरा रेल्वेसेवाही प्रभावित झाली आहे. ही आग नाफ्था गॅस पाइपलाइनमधील गळतीमुळे फैलावली होती.
हल्दियामध्ये एचपीएलच्या नाफ्था पाइपलाइनमध्ये आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाने त्वरित तेथे धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तर या आगीमुळे लोकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना भरपाई देण्याचा विचार केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Comments are closed.