अँजेलिनासोबत प्रियांका दिसणार आहे.

अभिनेत्रीला मिळाला मोठा प्रोजेक्ट

देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूडसोबत हॉलिवूडमध्येही मोठे यश मिळवित आहे. प्रियांकाने यापूर्वीच अनेक मोठे चित्रपट अन् सीरिज मिळविले असून आता तिच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट लागला आहे. प्रियांकाने स्वत:च या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे. खास बाब म्हणजे या प्रोजेक्टमध्ये प्रियांकासोबत हॉलिवूड स्टार एंजेलिना जोलीही दिसून येणार आहे.

एंजेलिनासोबत मी काम करणार असल्याचे तिने सांगितले आहे. हा प्रोजेक्ट चित्रपट असेल का वेबसीरिज हे मात्र तिने स्पष्ट केलेले नाही. प्रियांका याचबरोबर बॉलिवूडमध्येही सक्रीय झाली आहे. एस.एस. राजामौली यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘वाराणसी’द्वारे ती पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन असणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 7 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. प्रियांका याचबरोबर मीरा नायर यांच्याकडून दिग्दर्शित बायोग्राफिकल ड्रामा अमरीमध्ये मुख्य भूमिकेत आहे. निकोलस स्टोलरचा चित्रपट जजमेंट डे मध्येही ती दिसून येणार आहे.

Comments are closed.