IND vs ENG: संजू सॅमसन-वैभव सूर्यवंशी दोघेही खेळणार? दुसऱ्या टी20 सामन्यात कशी असणार टीम इंडिया?

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील टी20 मालिकेची सुरुवात झाली आहे. पहिल्या टी20 सामन्यात भारताने 189 धावा केल्या होत्या, परंतु पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही आणि सामना रद्द करावा लागला. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना शनिवारी, 4 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryavanshi) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का?

क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञांच्या मते संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी दिली पाहिजे, कारण सॅमसन गेल्या काही सामन्यांपासून फॉर्ममध्ये नाही. आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी20 सामन्यांत सॅमसनला धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्येही तो केवळ एक धाव काढू शकला.

त्यामुळे अशीही शक्यता आहे की वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन हे दोघेही खेळू शकतील. म्हणजेच, सॅमसन संघात कायम राहील आणि वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळेल. मात्र, अशा परिस्थितीत शिवम दुबेला पाचव्या गोलंदाजाची भूमिका पार पाडावी लागेल आणि संजू सॅमसनला मधल्या फळीत (मिडिल ऑर्डर) फलंदाजी करावी लागेल.

प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir & Shreyas Iyer) आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुसऱ्या टी20 सामन्यात कोणत्याही बदलाशिवाय उतरण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत वैभव सूर्यवंशीला आपल्या पदार्पणासाठी आणखी वाट पाहावी लागू शकते. दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांच्या जोडीसह मैदानात उतरू शकतो. याव्यतिरिक्त, शिवम दुबे गोलंदाजीचा सहावा पर्याय असेल.

दुसऱ्या टी20 सामन्यात भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

Comments are closed.