‘नागबंधम’ची दमदार सुरुवात, नाईट शोला प्रेक्षकांची गर्दी, पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली कोटींची कमाई – Tezzbuzz

विराट कर्ण अभिनित नागबंधम: द सिक्रेट ट्रेझर हा एक पौराणिक एक्शन चित्रपट आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर याने भारतात पहिल्याच दिवशी 3.25 कोटी कमावले आहेत. पहिल्या दिवसाचा व्यवसाय देशभरातील 3202 शोमधून झाला, ज्यात एकूण 22% प्रेक्षक उपस्थिती होती.

नागबंधम: द सिक्रेट ट्रेझर हा चित्रपट अभिषेक नामा (nama)यांनी दिग्दर्शित केली आहे. हा चित्रपट भारतीय पौराणिक कथा आणि इतिहासावर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षक ही कथा जाणुन घेण्यासाठी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तसेच यातील एक्शन, आणि अभिनय जबरदस्त आहे. तर यात विराट कर्णने मुख्य भूमिका साकारली असून, नाभा नटेश आणि ऐश्वर्या मेनन यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. आणि सर्व चित्रपटांमध्ये तेलुगू आवृत्तीला सर्वोत्तम प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी त्याची एकूण उपस्थिती 24.87% होती. हिंदी आवृत्तीची एकूण उपस्थिती 12.53% होती, तर तमिळ आवृत्तीची उपस्थिती 10.90% होती. कन्नड आवृत्तीची उपस्थिती 17.38% नोंदवली गेली. मल्याळम आवृत्तीची उपस्थिती दिवसभरात 4.30% होती.

‘नागबंधम: द सिक्रेट ट्रेझर’ हा चित्रपट ही प्राचीन दंतकथा आणि गुप्त खजिन्यांवर आधारित आहे. तसेच पौराणिक कथा,  आणि कल्पनारम्यता यांचा संगम साधणारी एक कथा सादर करते. ही कथा रहस्यमय “ब्रह्मकमळ”च्या शोधाभोवती फिरते. विराट “रुद्र” रूपातील कर्णाची भूमिका साकारतो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पवित्र फूल मिळवू पाहणाऱ्या अब्दालीचा सामना करतो. तर हा चित्रपट अश्या प्रकारे पौराणिक, रहस्यमय कथा आहे. त्यामुळे ती आता चात्याच्या पंसतीस उतरताना दिसत आहे.

‘जेलर 2’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, हा चित्रपट पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडणार का?

Comments are closed.