भाजपचा ड्रामा कधीच संपत नाही! नौटंकी करण्यापेक्षा महापौरांनी शहर चालवण्यावर लक्ष केंद्रीत करावे – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. अशातच शहर चालवण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मुंबईच्या महापौर रितू तावडे अनेक अधिकारी आणि फोटोग्राफर्सचा मोठा फौजफाटा सोबत घेऊन नौटंकी करताना दिसत आहे. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. याच्यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.

X वर एक व्हिडीओ रिशेअर करत आदित्य ठाकरे यांनी महापौर रितू तावडे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, “भाजपचा ड्रामा कधीच संपत नाही. अधिकारी आणि फोटोग्राफर्सचा मोठा फौजफाटा सोबत घेऊन ही नौटंकी करण्याऐवजी, महापौरांनी शहर चालवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “आपण आशा करूया की, त्या या लोकांना बांगलादेशी म्हणणार नाहीत आणि पावसाळ्याच्या दिवसात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या किंवा काम नसलेल्या मुंबईकरांमध्ये त्यांना कोणतेही षडयंत्र दिसणार नाही.”

Comments are closed.