100 दिवसांत स्वदेशी बनावटीची उग्राम रायफल.
सीएपीएफमध्ये सामील करण्याची तयारी : सर्व परीक्षणांमध्ये उत्तीर्ण
न्यूज एजन्सी/ हैदराबाद
भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेला बळ देत तेलंगणातील स्टार्टअप द्विप डिफेन्सने एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. स्टार्टअप द्विप डिफेन्सकडून विकसित यूग्राम रायफलने सैन्य आणि गृह मंत्रालयाची सर्व परीक्षणं यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. डीआरडीओच्या शस्त्र संशोधन आणि विकास संस्थेसोबत (एआरडीई) संयुक्त स्वरुपात विकसित ही रायफल केवळ 100 दिवसांच्या विक्रमी कालावधीत डिझाइन अन् निर्मित करण्यात आली आहे. याचबरोबर ही रायफल देशाच्या सर्वात वेगवान स्वदेशी शस्त्रास्त्र विकास कार्यक्रमांपैकी एक ठरली आहे.
ही आधुनिक रायफल आता सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि एनएसजी यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये (सीएपीएफ) सामील होण्याच्या प्रक्रियेत आहे. या रायफलने सैन्याच्या जनरल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट म्हणजेच सीएसक्यूआर टेस्ट, सर्व ऋतूंमध्ये झालेली फील्ड ट्रायल आणि गृह मंत्रालयाच्या बोर्ड टेस्टला यशस्वीपूर्ण पूर्ण केले आहे.
द्विप डिफेन्सला 2021 मध्ये उत्पादन परवाना मिळाला होता. यानंतर कंपनीने हैदराबादमध्ये तेलंगणा सरकारकडून मिळालेल्या 13 एकरपेक्षा अधिक जमिनीवर एक पूर्णपणे तयार उत्पादन प्रकल्प स्थापन केला. आमचा प्रवास 2021 मध्ये उत्पादन परवान्यासोबत सुरू झाला, आता आम्ही 100 हून अधिक स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणाली आणि त्यांचे प्रकार विकसित केले आहेत, ज्यात यूग्राम आमचे प्रमुख प्लॅटफॉर्म ठरले आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी आम्ही देशातच विश्वस्तरीय संरक्षण उत्पादने निर्माण करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत असे उद्गार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिबू जोसेफ यांनी काढले आहेत.
4 किलोग्रॅमपेक्षा कमी वजन
यूग्राममध्ये एक आधुनिक गॅस-संचालित रोटेटिंग बोल्ट सिस्टीम असून याचे वजन चार किलोग्रॅमपेक्षा कमी आहे. तर याची प्रभावी रेंज 500 मीटर आहे. द्विप डिफेन्स आता तेलंगणातील प्रकल्पात याचे उत्पादन करत आहे. स्वदेशी सब-मशीन गन, असॉल्ट रायफल, अल्ट्रा-लाइट मशीनगन आणि एक शस्त्रसज्ज ड्रोनविरोधी प्लॅटफॉर्मद्वारे स्वत:च्या पोर्टफोलियोचा कंपनी विस्तार करत आहे.
Comments are closed.