एक खराब मॅच अन् थेट संघाबाहेर… तिसऱ्या टी-20 सामन्यातून स्टार खेळाडू OUT? अशी असेल टीम इंडिया

टीम इंडिया तिसरी T20 प्लेइंग इलेव्हन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना नॉटिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 10:00 वाजता सुरू होईल. या मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची (Playing XI) घोषणा आधीच केली आहे. दुसरीकडे, भारतीय संघ नाणेफेकीच्या (Toss) वेळी आपली अंतिम प्लेइंग इलेव्हन जाहीर करेल. इंग्लंडने तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही, मात्र भारतीय संघात फेरबदल पाहायला मिळू शकतात. नॉटिंगहॅम टी-20 सामन्यात टीम इंडिया एका मोठ्या बदलासह मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रवी बिश्नोई तिसऱ्या टी-20 सामन्यातून होणार बाहेर? (Team India 3rd T20 Playing XI)

नॉटिंगहॅमच्या ट्रेंटब्रिज मैदानावरील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. त्यामुळे भारतीय फलंदाजीच्या फळीत बदल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजीमध्ये फिरकीपटू रवी बिश्नोईचे स्थान धोक्यात आले आहे. त्याला तिसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू दिला जाऊ शकतो. बिश्नोई मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचा भाग होता.

प्रिन्स यादव, सूर्यांश शेडगे आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात चुरस(Team India 3rd T20 Playing XI)

आता मुख्य प्रश्न असा आहे की जर रवी बिश्नोई प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला, तर त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश होणार? ‘क्रिकइन्फो’च्या रिपोर्टनुसार, तिसऱ्या सामन्यात रवी बिश्नोईच्या जागी प्रिन्स यादवला खेळवले जाऊ शकते. मात्र, या शर्यतीत इतर दोन खेळाडूंचे नावही समोर येत आहे. जर बिश्नोई बाहेर झाला, तर त्याच्या जागी सूर्यांश शेडगे किंवा अनुभवी वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. यावर अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार श्रेयस अय्यरला घ्यायचा आहे. कर्णधार श्रेयस अय्यरला या युके दौऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य ‘प्लेइंग XI’ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव/सूर्यांश शेडगे/वॉशिंग्टन ब्युटीफुल

इंग्लंडची ‘प्लेइंग XI’ : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्ंधर), जेकब बेथेल, टॉम बंटन, सॅम कुरान, विल जॅक्स, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर, जोश टोंग.

हे ही वाचा –

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या नावाने नको नको ‘तो’ खेळ! अखेर संतापला माजी कर्णधार; वैभव सूर्यवंशीबद्दलही स्पष्ट बोलला, नेमकं प्रकरण काय?

Comments are closed.