तिसऱ्या टी-20 वर पावसाचं सावट की टीम इंडियाचा पलटवार? नॉटिंगहॅममधून आलं सर्वात मोठं अपडेट

IND vs ENG हवामान अपडेट्स 3रा T20I सामना : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज, मंगळवारी (7 जुलै) नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मेन इन ब्लूला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत मजबूत पकड मिळवण्याचा प्रयत्न करेल.

कसे असेल नॉटिंगहॅमचे हवामान? (IND vs ENG Weather Updates 3rd T20I Match)

हा रोमांचक सामना सुरू होण्यापूर्वी चाहत्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. पावसाच्या सावटाबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे हवामान अंदाजावरून स्पष्ट होत आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 5:30 वाजता, तर भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल. ॲक्युवेदरच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान नॉटिंगहॅमचे तापमान सुमारे १७ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. सामन्याच्या वेळी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. ताशी 15 ते 35 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. सर्वात महत्त्वाची गोड बातमी म्हणजे, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता केवळ 2 टक्के आहे. त्यामुळे पावसामुळे सामन्यात कोणताही व्यत्यय येण्याची शक्यता नाही. चाहत्यांना संपूर्ण 40 षटकांच्या खेळाचा आनंद घेता येईल.

मालिकेची सद्यस्थिती

चेस्टर-ली-स्ट्रीट येथे खेळवला गेलेला या मालिकेतील पहिला टी-20 सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने 4 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत गरजेचे आहे.

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यांश शेडगे, प्रिन्स यादव.

इंग्लंड संघ : हॅरी ब्रूक (उजवीकडे), फिलिप सॉल्ट, जोस बटलर (उजवीकडे), जेकब बेथेल, टॉम बंटन, विल जॅक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, आदिल रशीद, जोश टंग, सोनी बेकर, रेहान अहमद, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, साकिब महमूद, ल्यूक वुड.

हे ही वाचा –

Ind Vs Eng 3rd T20 : वैभव सूर्यवंशीचा सराव करतानाचा वेदनादायी व्हिडिओ व्हायरल! चेंडू थेट बरगड्यांना लागला, तिसऱ्या टी-20 खेळणार की नाही?

Comments are closed.