ऍण्टॉप हिल येथे ‘रामरक्षा’ आंदोलन
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील लुटमारीचा तीव्र निषेध करत आज शिवसेनेच्या वतीने ऍण्टॉप हिल येथे रामरक्षा, महाआरती आणि निषेध आंदोलन केले. शीव कोळीवाडा विधानसभेच्या विद्यालंकार मार्ग, दोस्ती एकर्स येथील श्री हनुमान मंदिर येथे हे आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते, सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शीव कोळीवाडा विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार यांनी या निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, महिला विभाग संघटक पद्मावती शिंदे, निरीक्षक शिवाजी गावडे, विधानसभा संघटक गजानन पाटील, विधानसभा समन्वयक रणजित चोगले, उपकार खोत, सहसंघटक प्रशांत भिसे, घनःशाम गवंडी, उपविभागप्रमुख राजेश कुचिक, प्रभाकर भोगले, एकनाथ पवार, शाखाप्रमुख सचिन खेडेकर, नितीन पोटले, संजय कदम, समाधान जुगदर, प्रशांत जाधव, यशवंत पवार, युवासेना विभाग अधिकारी ऋषी नेळगे, मुंबई समन्वयक शैलेश पाटील, लुवा गवस, प्रीतम निंबाळकर, सुहासिनी ठाकूर आदी उपस्थित होते.
Comments are closed.