वर्ल्ड कप राऊंड अप – कैरोत ममी झोपलीच नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इजिप्त 2-0 पुढे होती. अर्जेंटिनाच्या चेहऱ्यावर पराभव आणि कैरोत विजयाची तयारी सुरू होती, पण पुढच्या तेरा मिनिटांत फुटबॉलने पिरॅमिड उलटा केला. 2-1, मग 2-2 आणि अखेर 3-2! अंतिम शिट्टीनंतर अर्जेंटिनात फटाके फुटत होते, पण इजिप्तमध्ये संतापाचा ज्वालामुखी धुमसत होता. झिकोचा रद्द गोल, पेनल्टीचे दावे आणि वारचे निर्णय चर्चेत आले. काल कैरोतील ममी शांत झोपली नाही. ती रात्रभर एकच प्रश्न विचारत होती की, आम्हाला मेस्सीने हरवलं की शिट्टीने?

सलाहच्या मिठीत पराभव रडला!

एका बाजूला मेस्सीचा प्रवास वाचला. दुसऱया बाजूला मोहम्मद सलाहचे स्वप्न तुटले. फुटबॉलची क्रूरता यापेक्षा वेगळी काय असणार? अंतिम शिट्टीनंतर इजिप्तचे खेळाडू मैदानावर कोसळले. कुणी चेहरा झाकला, कुणी गवताकडे निर्विकार पाहत राहिला. 79 मिनिटे विजय हातात धरलेल्या संघासाठी हा पराभव नव्हता; ही हातातून निसटलेली जिंदगी होती. त्या गर्दीत सलाहचा चेहरा बरंच काही सांगत होता. एका महानायकाला पुनर्जन्म मिळाला आणि दुसऱयाच्या मिठीत पराभव हमसून रडला.

Comments are closed.