फिफाने वर्ल्ड कप फिक्स केलाय! इजिप्तचा गोल रद्द केला अन् खेळाडू भडकला, मोहम्मद सलाहवर केला पंचांनी अन्याय
फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाने इजिप्तचा 3-2 असा पराभव केला. 78 व्या मिनिटापर्यंत इजिप्त 2-0 ने आघाडीवर होता. अर्जेंटिनाने जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला. पण अर्जेंटिनाच्या बाजूने घेतलेल्या पंचांच्या अनेक निर्णयांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुस्तफा झिकोने तर थेट हा वर्ल्ड कपच फिक्स असल्याचे म्हटले आहे.
व्हीएआरने इजिप्तचा गोल रद्द केला
इजिप्तने 58 व्या मिनिटाला गोल केला. मुस्तफा झिकोने पोस्टच्या आतून गोल केला. गोलनंतर त्याने जल्लोष केला, पण थोडय़ाच वेळात तो गोल रद्द करण्यात आला. व्हीएआर तपासणीनंतर पंचांनी ठरवले की मिडफिल्डर मारावान अटियाने अर्जेंटिनाचा बचावपटू लिसांद्रो मार्टिनेझवर फाऊल केला होता. यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सलाहवर फाऊल दिला नाही
एन्झो फर्नांडिसने अर्जेंटिनाचा सामन्यातील तिसरा आणि निर्णायक गोल केला. हा गोल अतिरिक्त वेळेत झाला. इजिप्तने प्रथम आक्रमण केले. अर्जेंटिनाच्या एका बचावपटूने बॉक्समध्ये मोहम्मद सलाहवर फाऊल केला. बचावपटूच्या पायामुळे सालाह खाली पडला. त्यानंतर अर्जेंटिनाने प्रतिआक्रमण करून गोल केला. खेळाडूंनी अपील करूनही रेफ्रीने त्या टॅकलकडे दुर्लक्ष केले आणि व्हीएआरचा सल्लाही घेतला नाही.
झिकोने व्यक्त केली नाराजी...
सामन्याबद्दल बोलताना झिको म्हणाला, ‘पंचांनी आमच्यावर अन्याय केला आहे आणि संपूर्ण जगाने तो पाहिला आहे. पंचांनी संपूर्ण देशाच्या प्रयत्नांवर पाणी फिरवले आहे. ते पंच सामन्याच्या अगदी सुरुवातीपासूनच आमच्या विरोधात होते. पंचांनी आम्हाला अर्जेंटिनाविरुद्ध 2-0 ने जिंकू दिले नाही. ही स्पर्धा फिक्स केलेली आहे. आमच्यासाठी जो सर्वांच्या वर बसलेला पुरेसा आहे आणि तोच सर्व घडलेल्या गोष्टींचा सर्वोत्तम न्यायाधीश आहे.’
Comments are closed.