धक्कादायक! प्रशिक्षणादरम्यानच प्रशिक्षकाची विमानातून उडी; प्रशिक्षणार्थिने सुरक्षितपणे उतरवले विमान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अर्जेंटिनामध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रशिक्षण सत्रादरम्यान विमानचालन प्रशिक्षकाने विमानातून उडी घेत जीवन संपवले. यानंतर प्रशिक्षणार्थी पायलटने विमान सुरक्षित खाली उतरवले. लिअँड्रो अँड्रेस बर्टाझो (42) असे उडी घेतलेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. लिअँड्रो यांनी टोकाचे राऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. त्यांचा मृतदेह सापडला असून रुग्णालयात पाठवला आहे. मध्य अर्जेंटिनामधील टोलेडो येथे ही घटना घडली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लिअँड्रो हे रोझारिओ नामक प्रशिक्षणार्थी पायलटसोबत ‘सेसना 150’ (Cessna 150) या विमानात होते. विमान हवेत असतानाच लिअँड्रो यांनी प्रशिक्षणार्थीला तुला काय करायचे आहे ते माहित आहे, असे म्हटले. यानंतर त्यांनी हेडसेट आणि सीटबेल्ट काढला. यानंतर त्यांनी विमानाचा दरवाजा उघडला आणि उडी घेतली. यानंतर प्रशिक्षणार्थीने सुरक्षितरित्या विमान जमिनवर उतरवले.

लिअँड्रो ज्या ‘फ्लाइंग पॅरट कॉर्डोबा’ (Flying Parrot Cordoba) या फ्लाइंग स्कूलमध्ये काम करत होते, तिथले संचालक एडुआर्डो अल्वारेझ यांनी सांगितले की, प्रशिक्षक विमानातून उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नव्हते. त्याच दिवशी यापूर्वी बर्टाझो यांनी दुसऱ्या एका प्रशिक्षणार्थीसोबतही विमान उडवले होते, असे अल्वारेझ यांनी पुढे नमूद केले.

Comments are closed.