पुन्हा युद्धाचा भडका, कच्च्या तेलाच्या किमतीत उसळी; दोन दिवसांत अमेरिकेचे 170 हल्ले, हिंदुस्थान महागाईच्या खाईत? होर्मुझ पुन्हा बंद होणार?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेने इराणवर दोन दिवसांत 170 हल्ले केले. त्यानंतर इराणने प्रत्युत्तर देत कतार, कुवैत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर मोठे ड्रोन हल्ले केले आहेत. दुसरीकडे अमेरिका-इराण संघर्ष पुन्हा पेटल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. होर्मुझचा मार्ग इराणने रोखून धरल्यामुळे जगावर पुन्हा इंधन संकटाची भीती निर्माण झाली आहे.

इराणच्या बुशहर येथील एकमेव अणुऊर्जा प्रकल्पाजवळ अमेरिकेने हवाई हल्ला केला. हल्ला दुपारी 12 च्या सुमारास झाला. या हल्ल्यात अणुऊर्जा प्रकल्पाचे किती नुकसान झाले, याची माहिती देण्यात आलेली नाही. इराणने मात्र प्रकल्पावर हल्ला झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणने कतार, कुवैत आणि बहरीनमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले. कुवैत येथील पॅट्रियट क्षेपणास्त्र यंत्रणा त्यात उद्ध्वस्त झाली. तसेच कतारची हल्ल्याची पूर्वसूचना देणारी सॅटेलाईट यंत्रणा आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्कराच्या इंधन साठ्याला लक्ष्य करण्यात आले. याचा अमेरिकेला मोठा फटका बसला आहे. याशिवाय इराणने जॉर्डन येथील अमेरिकन तळावर दहा बॅलिस्टीक क्षेपणास्त्रs डागली. अजराक येथील तळाला इराणने लक्ष्य केले होते. त्यापूर्वी अमेरिकेने सीरिक शहरात हल्ला केला. या हल्ल्यात तीन जण ठार झाले असून 15 जण जखमी झाले आहेत. आज होर्मुझजवळच्या बंदर अब्बास शहरावरही हल्ले करण्यात आले. दरम्यान, इराण युद्धाची पुन्हा ठिणगी पेटल्यानंतर हिंदुस्थानची चिंता वाढली आहे. अमेरिकेने इराणच्या अतिशय महत्त्वाच्या चाबहार बंदरावर हल्ला केला. हिंदुस्थानसाठी हे महत्त्वाचे व्यापारी बंदर असून या बंदराच्या उभारणीमध्ये हिंदुस्थानने हजारो कोटी रुपये गुंतवले आहेत.

इमाम रझा दर्ग्याचे महत्त्व

इराणमध्ये दफन करण्यात आलेले इमाम रझा हे शिया पंथीयांचे एकमेव इमाम आहेत. ते शिया पंथीयांचे आठवे इमाम मानले जातात. त्यांची तत्कालीन शासक अब्बासी खलीफा यांनी हत्या केली होती. त्यामुळे इमाम रझा यांना दफन केले ती जागा ‘मशहद’ अर्थात ‘शहीद झाले’ म्हणून ओळखली जाते. त्यांच्याच पवित्र भूमीत आपल्यालाही दफन करण्यात यावे, ही खामेनी यांची इच्छा होती.

होर्मुझच्या मार्गावर पुन्हा अडथळा

इराणवर अमेरिकेने नव्याने हल्ले केल्यामुळे कच्चे तेल एका टक्क्याने महाग झाले आहे. गुरुवारी कच्च्या तेलाचे दर 76 डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचले होते. त्यापूर्वी हे दार 70 डॉलर प्रतिबॅरलच्या आत होते. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक पुन्हा प्रभावित झाली आहे. होर्मुझमधून मार्ग न मिळाल्यामुळे कुवेतचे 20 लाख बॅरल कच्चे तेल घेऊन जाणारे भारतीय ध्वजांकित टँकर ‘लीला वादिनार’ ओमानच्या किनाऱयावरून परतले. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत करणे कठीण होईल, असे इराणने स्पष्ट केले आहे.

खामेनींच्या अंत्ययात्रेत ‘किल ट्रम्प’चे फलक

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पार्थिव इराणमधील मशहद येथे दफन करण्यात येणार आहे. मशहदमध्ये काढण्यात आलेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत गुरुवारी लाखो नागरिक सहभागी झाले होते. अनेक लोकांच्या हातात इंग्रजीत ‘आम्ही ट्रम्प यांना मारू’ असे लिहिलेले फलक होते.

Comments are closed.