राम मंदिर लुटणाऱ्यांनी शिकवू नये, आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांचा भातखळकरांवर भडिमार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार, टीईटी पेपरफुटी, अयोध्येतील राम मंदिर चोरी आदी विविध मुद्दय़ांवरून विधिमंडळ अधिवेशनात आधीच राजकीय वातावरण तापलेले असतानाच अतिवृष्टी आणि पुराच्या मुद्द्यावरील चर्चेदरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून सरकारची बाजू घेत मधेच लुडबुड करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर राम मंदिर लुटणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, तुमचं ज्ञान, तुमची कुवत, तुमची झेप आणि निष्ठा आम्हाला माहीत आहे, असा एकामागून एक शब्दांचा भडिमार करत शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे व शिवसेना गटनेते भास्कर जाधव यांनी भातखळकर यांची बोलती बंद केली.

मुंबई आणि उपनगरांसह वसई-विरार भागात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून विधानसभेत आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारची कोंडी केली. या चर्चेची सुरुवात करताना भास्कर जाधव यांनी वसई-विरारमधील गंभीर पूरस्थितीकडे लक्ष वेधत ‘रहिवासी पुराच्या पाण्यात बुडाले आहेत, पण उत्तर देण्यासाठी सभागृहात कॅबिनेट मंत्री कुठे आहेत?’ असा सवाल केला. त्यावर राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी आपण उत्तर देणार असे सांगितले. इतक्या महत्त्वाच्या चर्चेला राज्यमंत्री उत्तर देणार असतील आणि बेतालपणे वागत असतील तर श्राद्ध घातल्यासारखी चर्चा होईल, असे भास्कर जाधव म्हणाले. त्यावर आमदार भातखळकर यांनी मधेच तोंड घालत, सरकार संवेदनशीलपणे चर्चेला उत्तर देत असताना सरकार बेताल आहे, अशी असंसदीय भाषा चालणार नाही, असे म्हणत भास्कर जाधव यांच्या बोलण्यावर आक्षेप घेताच आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत राम मंदिर लुटणाऱयांनी आम्हाला सांगू नये, असे भातखळकर यांना सुनावले. यावेळी आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्याशी भातखळकर यांची शाब्दिक चकमक उडाली.

तुमचं वय झालंय… नीट बोला, खाली बसा

तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगू नका. राम मंदिर लुटणाऱयांनी तर आम्हाला अजिबात सांगू नये. तुम्ही आधी खाली बसा. नीट बोला, नीट बोला. आता तुमचं वय झालंय. त्यामुळे तुमचं वय पाहून बोला! सभागृहात काय चाललंय? अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी भातखळकर यांची बोलती बंद केली.

निष्ठेचे काय सांगता, राज ठाकरेंनी तुम्हाला पक्षात घेतलं नव्हतं

तुमचं ज्ञान, तुमची कुवत, लोकांना माहिती आहे. लय घमेंडखोर, नुसतं बसलाय कोपऱ्यात. तुम्हाला कोणी अधिकार दिला मधे बोलायचा? जणू काही तेच सर्वज्ञ आहेत. तुम्ही कोणाला निष्ठा सांगता? राज ठाकरेंकडे गेला होतात. त्यांनीही तुम्हाला पक्षात घेतलं नव्हतं’, असे खडे बोल भास्कर जाधव यांनी सुनावले.

Comments are closed.