बाल्कनी बनेल कॅफे; ट्राय करा या भन्नाट डेकोरेशन आयडिया

संध्याकाळी किंवा वीकेंडला एखाद्या छानशा कॅफेमध्ये जाऊन कॉफी पिणं कोणाला आवडत नाही? पण धावपळीच्या आयुष्यात दरवेळी बाहेर जाणं शक्य होतचं असे नाही. अशावेळी तुम्ही घराच्या बाल्कनीला कॅफे बनवू शकता. घरातली बाल्कनी ही फक्त कपडे वाळत घालण्याची किंवा झाडं ठेवण्याची जागा नाही. काही छोट्या बदलांच्या मदतीने हाच कोपरा घरातील सर्वात सुंदर आणि निवांत जागा नक्कीच बनवता येईल. चला जाणून घेऊयात तुमची साधीसुधी बाल्कनी एका सुंदर आणि रोमॅंटिक कॅफेमध्ये कशी बदलता येईल.

बसण्याची व्यवस्था

कॅफेचा फील येण्यासाठी बाल्कनीतील प्लास्टिकच्या खुर्च्या बदला. बाल्कनी लहान असेल तर फोल्डिंग लाकडी टेबल आणि खुर्च्या वापरा. तुम्ही एक छोटा हँगिंग झोपाळा लावू शकता. यावर रंगीबेरंगी आणि मऊ कुशन्स ठेवल्यास कॅफे लूक परफेक्ट तयार होईल.

झाडे

बाल्कनीत फुलझाडं आणि हर्ब्स नक्की ठेवा. यामध्ये मनी प्लांट, स्नेक प्लांट, तुळस, रोझमेरी अशी झाडे ठेवता येतील. झाडांमुळे बाल्कनीतील हवा ताजी राहण्यासही मदत होईल.

लाईट्स

कॅफेचे मुख्य आकर्षण लाईटिंग असते. त्यामुळे बाल्कनीत प्रखर पांढरा लाईट लावू नका. बाल्कनीच्या ग्रिलला किंवा भिंतीला फेअरी लाईट्स गुंडाळू शकता.

बाग टेबल

जागेनुसार टेबलचा आकार निवडा.  फोल्डिंग टेबल वापरल्यास गरजेनुसार ते सहज हलवता किंवा ठेवता येते.

सुगंधी मेणबत्त्या

टेबलवर एखादा लहान लॅन्टर्न किंवा सुगंधी मेणबत्त्या ठेवा. रात्रीच्या वेळी ही वॉर्म लाईटिंग बाल्कनीला रोमँटिक आणि शांत बनवेल.

पडदे

थेट पाऊस आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी हलके पडदे किंवा बांबूचे ब्लाइंड्स वापरा. हलक्या रंगांचे पडदे वापरल्यास जागा अधिक प्रशस्त वाटते. बांबू ब्लाइंड्स बाल्कनीला नैसर्गिक लूक देतात.

कृत्रिम गवत

बाल्कनीच्या जमिनीवर आर्टिफिशियल गवताची चटई अंथरल्यास गार्डनसारखा फील येतो आणि जागा अधिक उठून दिसते.

भिंतीची सजावट

बाल्कनीच्या एका भिंतीवर कोट्स असलेले वूडन बोर्ड किंवा एखादी छोटी फ्रेम लावा.

म्युझिक कॉर्नर

कॅफेमध्ये जसे मंद संगीत असते, तसा फील घेण्यासाठी बाल्कनीमध्ये एक छोटा ब्लूटूथ स्पीकर नक्की ठेवा.

कप-बशी

तुमच्या कॅफे बाल्कनीसाठी काही युनिक कप किंवा रंगीबेरंगी मग नक्की खरेदी करा.

हेही वाचा – पावसाळ्यात मुलांना घरातच गुंतवून ठेवतील ‘हे’ मजेदार उपक्रम

Comments are closed.