Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
नाशिक महापालिकेतल्या ठाकरेंच्या नगरसेवकांना शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठी ऑफर दिली जातेय असा आरोप होतोय… आणि या आरोपाला उत्तर देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं एकीची वज्रमूठ दाखवलीय… मात्र ही वज्रमूठ कायम राहते की आतापर्यंतच्या अनुभवानुसार ही मूठ सैल होते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय… सध्या पाऊस थांबलाय… मात्र नाशिकच्या राजकीय वर्तुळात बदलाचे वारे वाहू लागलेत का? नगरसेवक फुटले तरी…आणि नाही फुटले तरी..नाशिककरांना त्याचं काही सोयरं-सुतक नसेल,कारण ज्या महाराष्ट्रात खासदार आणि आमदार एका रात्रीत फुटत असतील,तिथे नगरसेवकांची काय गत…बाकी पक्षनिष्ठा, राजकीय विचारसरणी, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जनतेनं दाखवलेला विश्वास विसर्जित करण्यासाठी नाशिकमध्ये गोदावरी वाहतच आहे… पाहुयात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णींचा हा स्पेशल रिपोर्ट…
Comments are closed.