Rajapur News – बारसू अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात राजापूर पंचायत समितीत ठराव

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजापूर तालुक्यातील बारसू अणुऊर्जा प्रकल्पाच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजापूर पंचायत समितीच्या सभेत अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात ठराव करण्यात आला आहे. भविष्यात राजापूरात अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन भडकण्याची शक्यता आहे.

कोकणातील प्रस्तावित तीनही अणुऊर्जा प्रकल्पांच्या विरोधात ग्रामस्थ लढा उभारत आहेत. ग्रामपंचायतच्या ग्रामसभामधून विरोधाचा सूर उमटू लागला आहे. यापूर्वी गोवळ आणि धोपेश्वर ग्रामपंचायतीनी अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात ठराव मंजूर केले आहेत. राजापूरात अणुऊर्जा प्रकल्प विरोधी संघाची स्थापना करून लढा तीव्र करण्यात आला आहे. त्यापाठोाठ राजापूर पंचायत समितीत अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज ठराव करण्यात आला आहे.

Comments are closed.