चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल
लातूर बातम्या : लातूर जिल्ह्यातील रेणापूर (Latur Renapur) तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. खारोळा येथे बोअरवेलच्या कॉपर केबल चोरीच्या संशयावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत दोन्ही बाजूंवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
परिसरात शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन
रेणापूर पोलीस ठाण्यात कॉपर वायर चोरीच्या प्रयत्नाप्रकरणी तीन विधी संघर्षग्रस्त बालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कायदा हातात घेत अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याप्रकरणी सचिन नारायण राऊतराव (वय 40) आणि नितीन गोविंद शिंदे (वय 38) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1) आणि 126 अन्वये स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून पट्ट्यानं अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने आणि रेणापूरचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक आणि संबंधित कुटुंबीयांशी संवाद साधत परिसरात शांतता आणि सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले.
घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्यासंदर्भातही तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. अफवा पसरवणे, दिशाभूल करणारे संदेश प्रसारित करणे किंवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती शेअर करणाऱ्यांविरुद्धही आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
जालना शहरातील औद्योगिक परिसरामध्ये धक्कादायक घटना, खाजगी बस चालकाला तरुणाकडून मारहाण
जालना शहरातील औद्योगिक परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी बस चालकाला एका तरुणाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. बस अडवून बस मधील एका तरुणीला जबरदस्तीने खाली उतरवताना जाब विचारला असता, या आरोपी तरुणाने खाजगी बस चालकास मारहाण केली आहे. बस मध्ये या तरुणाने धुडगूस आणि शिवीगाळ केल्याच दृश्य बस च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. चालकाने केलेल्या मोबाईल रेकॉर्डिंग मध्ये या तरुणाचा प्रताप कैद झाला आहे. या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Comments are closed.