Omar Abdullah पूर्ण राज्य दर्जासाठी ओमर अब्दुल्ला आक्रमक जम्मू काश्मीर संबंधी दिल्लीत आंदोलन छेडणार
► वृत्तसंस्था श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी आक्रमकता दाखवली आहे. येत्या 20 जुलै रोजी ते आपल्या समर्थकांसह दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनासाठी परवानगी मागितली असली तरी त्यांच्या पक्षाला अद्याप परवानगी मिळालेली नाही.
काही लोक जाणीवपूर्वक या आंदोलनात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाने या आंदोलनासाठी विविध राजकीय पक्षांतील 52 नेत्यांना आमंत्रित केले आहे.
श्रीनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना ओमर अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्स गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनासाठी परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अद्याप मंजुरी मिळालेली नाही, असे म्हणाले.
हेही वाचा : Odisha Robbery चारचाकी गाडीला बांधून एटीएम मशीन उखडले, पैसे लुटून चोरांचा पोबारा
कलम 370 रद्द झाल्यापासून जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा परत देणे ही नॅशनल कॉन्फरन्सची प्रमुख मागणी राहिली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने कलम 370 च्या बहुतांश तरतुदी रद्द करून जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करत जम्मू-काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले होते. या निर्णयाला सात वर्षे होत आली असली तरी दोन्ही केंद्रशासित प्रदेशांना अद्याप पूर्ण राज्याचा दर्जा मिळालेला नाही.
Comments are closed.