विठूमाऊलीच्या भक्तीचा अनोखा थाट; आषाढीला असा करा अस्सल महाराष्ट्रीयन लूक!
आषाढ एकादशीनिमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांची पाऊले पंढरीकडे वळू लागलीत. आषाढी एकदशीचा उत्साह जसा पंढरीनगरीत दिसून येतो त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतो. केवळ वयोवृद्धचं नव्हे तर लहानांमध्ये वारीचा उत्साह ओसंडून वाहतो. अनेक शाळांमध्ये दिंडीचं आयोजन केले जाते. शहरांमध्येही अनेकजण पारंपरिक वेषभूषेत दिंडीत सहभागी होतात. पुरुष पारंपरिक वेशभुषा जसे की, धोती, पायजमा, टोपी, गळ्यात माळ परिधान घालतात तर महिला नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळस घेऊन माऊलीचा जयघोष करत पायी दिंडी करतात. तुम्हीही आषाढी एकदशीला मराठमोळा लूक करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊयात मराठमोळा लूक करण्याच्या काही सोप्या टिप्स
मराठमोळा लूक करण्यासाठी नऊवारी, पैठणी किंवा जरीकाठ असणाऱ्या पारंपरिक साड्यांची निवड करू शकता.
पांरपरिक लूकसाठी लाल, पिवळा, केशरी आणि हिरवा असे ब्राइट रंग निवडावेत. हे रंग उठावदार असल्याने आकर्षक लूक देतात.
तुळस, विठ्ठल-रुक्मिणीचे नक्षीकाम असलेली साडी आषाढी एकादशीला एक वेगळा आणि आकर्षक लूक देऊ शकतो. साडीवर शक्य नसेल तर हेच नक्षीकाम असलेले ब्लाउज साडीवर नक्की ट्राय करा.
साडी नेसताना पारंपरिक दागिने परिधान करावेत. जसे की, तोरण हार, ढुशी, बोरमाळ, हातात कुडी, पाटल्या, बाजूबंद, पैंजण, नथ आदी दागिने.
पारंपरिक लूकसाठी केसांचा अंबाडा बांधा. या अंबाड्यावर वेणी, फुले, बिंदी यांनी आकर्षक लूक मिळवता येईल.
Comments are closed.