इशिता रेवाळेची राष्ट्रकुलसाठी निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची जिम्नॅस्ट इशिता रेवाळे हिने आणखी एक उंच भरारी घेत थेट ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या हिंदुस्थानी संघात स्थान मिळवले आहे.

अवघ्या सहाव्या वर्षी जिम्नॅस्टिक्सची कसरत सुरू करणाऱ्या इशिताने घाम, जिद्द आणि सातत्याच्या बळावर हे स्वप्न साकार केले. प्रशिक्षक विशाल कटकदौंड यांच्या कसदार मार्गदर्शनाखाली घडलेली इशिता आता हिंदुस्थानच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स संघाचा महत्त्वाचा चेहरा ठरणार आहे.

जूनमध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेनंतर ही तिची सलग दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम आहे. सध्या ती इंग्लंडच्या साऊथ एसेक्स येथे हिंदुस्थानी संघाच्या विशेष प्रशिक्षण शिबिरात घाम गाळत आहे.

ओडिशातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेले उपविजेतेपद तिच्या दमदार फॉर्मची साक्ष देते. मार्गदर्शक नीलम बाबरदेसाई आणि पीटीकेएसचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांच्या पाठबळावर आता इशिताकडून राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची सुवर्ण अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments are closed.