सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाला पक्षातूनच आव्हान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र या निवडीला आक्षेप घेत पक्षाचे सचिव सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. यामुळे सुनेत्रा पवार यांचे अध्यक्ष पद धोक्यात आले आहे.

अजितदादांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व करण्यावरून सुनेत्रा पवार आणि पटेल-तटकरे समर्थकांत तीव्र मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर 26 फेब्रुवारीला अजित पवार गटाच्या सर्वसाधारण सभेत पटेल यांनीच सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सर्वानुमते त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. मात्र आता ही निवड प्रक्रियाच कायदेशीर आणि तांत्रिकदृष्टय़ा वैध नसल्याचा आक्षेप नोंदवत राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस पाठवून केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Comments are closed.