चायनीज पदार्थ नूडल्स, मंच्युरियनमध्ये वापरला जाणारा अजिनोमोटो किती धोकादायक?
हल्ली गल्लोगल्ली मिळणाऱ्या चायनीज पदार्थांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. पण, नूडल्स, मंच्युरियनसारख्या पदार्थांना अस्सल चायनीज चव देणारा पांढरा चमकदार अजिनोमोटो तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे. अजिनोमोटोचे अति सेवना मेंदूच्या पेशी कमकुवत करण्यापासून ते थेट लठ्ठपणा आणि हृदयविकाराला कारणीभूत ठरत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. आज आपण शरीरासाठी अजिनोमोटो किती धोकादायक हे पाहूयात.
अजिनोमोटो म्हणजे काय?
अजिनोमोटो हे मोनोसोडियम ग्लुटामेट हे फ्लेवर इन्हासंर आहे. यामुळे पदार्थाची चव वाढते. विशेष करून चायनीज पदार्थ.
अजिनोमोटोचे दुष्परिणाम –
काही व्यक्तींना अजिनोमोटो जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर डोकेदुखी, चेहऱ्यावर उष्णता जाणवू शकते. वैद्यकीय भाषेत या लक्षणांना ‘चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम’ म्हटले जाते.
अजिनोमोटोमध्ये असणारे ‘ग्लूटामेट’ मेंदूसाठी न्यूरोट्रांसमीटर म्हणून काम करते. शरीरात याचे प्रमाण मर्यादेबाहेर वाढल्यास मेंदूच्या पेशी अतिउत्तेजित होतात. यामुळे हळूहळू मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
अजिनोमोटोमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण बिघडते आणि रक्तदाब वाढतो. हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी याचे सेवन अत्यंत धोक्याचे ठरू शकते.
गर्भवती महिलांनी अजिनोमोटोयुक्त चायनीज अन्न खाणे टाळले पाहिजे, कारण त्याचा गर्भातील बाळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
अजिनोमोटो शरीरातील ‘लेप्टिन’ या संप्रेरकावर परिणाम करते. लेप्टिन आपल्याला पोट भरल्याची जाणीव करून देते. पण अजिनोमोटोमुळे ही यंत्रणा बिघडते, ज्यामुळे माणसाला वारंवार भूक लागते आणि वजन वेगाने वाढते.
काय काळजी घ्याल?
चायनीज खाण्यावर मर्यादा घाला.
रस्त्यावरील गाड्यांवर किंवा रेस्टॉरंटमध्ये चायनीज पदार्थ खाणे बंद करा.
घरी डिशेस बनवताना अजिनोमोटोऐवजी नैसर्गिक मसाले आणि चवीसाठी मीठ वापरा.
चिप्स, इन्स्टंट नूडल्स किंवा सॉस खरेदी करताना त्यावर ‘No Added MSG’ किंवा ‘MSG Free’ असे लिहिले आहे का, हे तपासून पहा.
हेही वाचा – पिझ्झा, बर्गर, बिस्किटं…मैद्याचे पदार्थ किती घातक?
Comments are closed.