Opposition Meet at Sonia's House सोनिया गांधींच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक, महत्वाच्या विषयांवर चर्चा

► नवी दिल्ली
संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनातील रणनीतिवरून सर्व विरोधी पक्ष 16 जुलै रोजी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेणार आहेत. विरोधकांना एका बॅनरखाली आणण्याच्या उद्देशाच्या अंतर्गत काँग्रेसच्या वतीने ही बैठक बोलाविण्यात आली आहे.

अधिवेशनादरम्यान पेपरलीक, ई20 इंधन, दानचोरी यासारख्या मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी आहे. याकरता काँग्रेसने द्रमुकची समजूत काढण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत. प्रियांका वड्रा आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत राहुल गांधींनी याकरता कंबर कसली आहे.

Comments are closed.