hafiz saeed Arrest Warrant हाफिज सईद विरोधात अजामिनपात्र वॉरंट जम्मू येथील विशेष न्यायालयाचा आदेश

►वृत्तसंस्था जम्मू
जम्मू येथील विशेष न्यायालयाने पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदच्या विरोधात पहलगाम हल्ल्याप्रकरणी अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. निष्पक्ष चौकशीसाटी हाफिज सईदला ताब्यात घेत चौकशी करावी लागणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

यापूर्वी 6 जुलै रोजी एनआयएने पहलगाम हल्ल्याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट हाफिज सईदनेच रचला होता, तसेच त्याने भारताविरोधात युद्ध छेडले असल्याचे एनआयएने म्हटले होते.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड

भारत आणि अमेरिकेकडून जागतिक स्तरावर घोषित दहशतवादी सईदवर 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्याचाही आरोप आहे. जम्मूमधील विशेष एनआयए न्यायालयासमोर सादर पुरवणी आरोपपत्रात 76 वर्षीय सईदवर व्यक्तिगत स्वरुपात आणि प्रतिबंधित लष्कर-ए-तोयबा आणि त्याची प्रॉक्सी संघटना ‘द रेजिस्टेंस फ्रंट’चा प्रमुख म्हणून आरोप करण्यात आले आहेत.

हाफिज सईद विरोधात भारतीय न्याय संहिता, 2023 आणि युएपीए अधिनियम, 1967 च्या अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधाचा रहिवासी हाफिज सईद पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आहे आणि तो जाणूनबुजून अटकेपासून वाचत असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले आहे.

हेही वाचा: Nashik Women Molestation महिलेवर जमावाचा हल्ला, पाठलाग करत गाडीची तोडफोड, “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” घोषवाक्य हवेतच…

डीआयजींकडे पाठविले वॉरंट
एनआयएने पुढील कायदेशीर कार्यवाही आणि चौकशी पुढे नेण्यासाठी फरार दहशतवाद्याच्या विरोधात ओपन-डेटेड (तारीख नमूद नसलेले) अजामिनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. निष्पक्ष, पूर्ण अन् प्रभावी चौकशीसाठी आरोपीला अटक अन् कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले गेले आहे. कायद्यानुसार वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी ते एनआयएच्या डीआयजीकडे पाठविण्यात आले आहे.
15 सप्टेंबरला पहिले आरोपपत्र
पहलगाम हल्ल्यानंतर एनआयएने 15 डिसेंबर 2025 रोजी पहिले आरोपपत्र सादर केले होते. यात पाकिस्तानचा दहशतवादी हँडलर साजिद जट समवेत 6 दहशतवाद्यांना आरोपी करण्यात आले होते. त्यावेळी हाफिज सईदचे नाव समोर आले नव्हते. पहलगाम हल्ल्यात सामील 3 दहशतवादी मारले गेले आहेत. तर त्यांचा हँडलर सैफुल्लाह जट्ट उर्फ लंगडा अद्याप जिवंत असून त्याच्यावर 10 लाखाचे इनाम आहे.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे धर्म विचारत लोकांची हत्या केली होती. या हल्ल्यात 26 पर्यटक मारले गेले होते. यानंतर भारताने 6-7 मे दरम्यान ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान अन् पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले पेले होते. या कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.

Comments are closed.