श्रद्धा वालकर प्रकरणाला चार वर्षे पूर्ण; खटला लांबवण्यासाठी आफताबकडून नवनवीन डाव, कुटुंबाचा संत

श्रद्धा वॉकर मृत्यू प्रकरण वसई : देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर (Shraddha Walker Case) हत्याकांडाला चार वर्षे उलटूनही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला (Aaftab Ameen Poonawala) याच्यावर श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र, खटल्याची सुनावणी अत्यंत संथ गतीने सुरू असून, आरोपी आफताब पूनावालाला एम.ए. परीक्षेसाठी सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी, यापूर्वी दातांच्या उपचारांसाठी आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यासाठीही सवलती मिळाल्याचे समोर आले आहे. या कारणांमुळे खटला वारंवार लांबत असल्याचा आरोप श्रद्धाच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 215 हून अधिक सुनावण्या होऊनही पुरावे सादर करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. श्रद्धा वालकरचे वडील न्यायाची वाट पाहतच निधन पावले, तर तिच्या आजीचेही खटला सुरू असतानाच निधन झाले. पुरावा म्हणून जतन केलेले अवशेष अद्याप कुटुंबाच्या ताब्यात न दिल्याने श्रद्धावर अंत्यसंस्कारही होऊ शकलेले नाहीत. श्रद्धाची आत्या राजल नाईक यांनी आरोपीला वारंवार दिल्या जाणाऱ्या सवलतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करून श्रद्धाला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. (Shraddha Walker Delhi Death Case)

नेमकं प्रकरण काय? (Shraddha Walker Death Case)

श्रद्धा वालकर ही एक 27 वर्षीय तरुणी होती, जिची 18 मे 2022 रोजी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीतील छतरपूर येथील घरात निर्घृणपणे हत्या केली होती. आरोपी आफताबने हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, ते महिनाभर 300 लिटरच्या फ्रीजमध्ये साठवले आणि नंतर वेगवेगळ्या जंगलात फेकून दिले। नोव्हेंबर 2022 मध्ये श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.  हा खटला दिल्लीतील न्यायालयात प्रलंबित आहे. जुलै 2026 मध्ये, आरोपी आफताबला तिहार तुरुंगात एमए (समाजशास्त्र) ची परीक्षा देण्याची परवानगी मिळाल्यामुळे न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे तिचे वडील विकास वाळकर यांचे 2025 मध्ये निधन झाले होते.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Shraddha Walker Murder Case: आरोपीने लेकीचे 35 तुकडे केले, बाप शेवटपर्यंत लढत राहिला; श्रद्धा वालकरच्या वडिलांचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?

Comments are closed.