शनिवारपर्यंत चौपाट्यांवर जाऊ नका
मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी समुद्राला मात्र आजपासून प्रचंड उधाण आले आहे. शनिवार, 18 जुलैपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असून गुरुवार, 16 जुलै रोजी सर्वाधिक उंच म्हणजे 4.98 मीटर लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पर्यटक-मुंबईकरांनी शनिवारपर्यंत समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशा उसळणार लाटा
15 जुलै – दुपारी – 12.51 वा. – उंची – 4.85 मी.
16 जुलै – दुपारी – 01.36 वा. – उंची – 4.98 मी.
17 जुलै – दुपारी – 02.19 वा. – उंची – 4.83 मी.
18 जुलै – दुपारी – 03.00 वा. – उंची – 4.66 मी.
मुंबईत सात चौपाटय़ा आहेत. खवळलेला समुद्र आणि उसळणाऱ्या लाटांमुळे पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून किनाऱ्यांवर लाइफ गार्ड तैनात करण्यात आले असून दक्षता घेण्यात येत आहे.
Comments are closed.