सियानंतर आता उर्मिला आली चर्चेत! लग्नाच्या तीन दिवसाआधी बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने नवऱ्याला सं

रांची: पुण्यातील सिया गोयल हिने आपल्या होणाऱ्या पतीची हत्या (Crime News) केल्याची घटना ताजी असतानाच, झारखंडमध्येही अशाच प्रकारची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. झारखंडमधील गिरिडीह येथे राहणाऱ्या उर्मिला कुमारी या तरुणीने लग्नाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना आपला होणारा पती नीरज हाजरा याची निर्घृण हत्या केली. या धक्कादायक गुन्ह्यासाठी तिने तिचा प्रियकर म्हणजेच स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा नवरा (मेहुणा) याची (Crime News) मदत घेतली. या बहुचर्चित अपहरण आणि हत्याकांड प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी उर्मिला कुमारी आणि तिचा मेहुणा सुभाष पासवान ऊर्फ राजदेव हाजरा या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.(Crime News)

Crime News:  मेहुण्यासोबतचे प्रेमसंबंध ठरले हत्येचे कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला आणि तिच्या बहिणीचा नवरा सुभाष हाजरा (वय ३०, रा. जमुई, बिहार) या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सूत जुळले होते आणि त्यांच्यात घनिष्ठ प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळात उर्मिलाचे लग्न नीरज हाजरा याच्यासोबत ठरले. नीरजशी लग्न ठरल्यापासून सुभाष उर्मिलावर हे लग्न मोडण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र, लग्न मोडणे शक्य न झाल्याने त्यांनी नीरजलाच कायमचे मार्गातून हटवण्याचा अत्यंत क्रूर कट रचला.(Crime News)

Crime News:  पार्टी आणि भेटीच्या बहाण्याने बोलावून घात केला

नीरज हाजरा हा राजस्थान येथे कामाला होता आणि स्वतःच्या लग्नासाठीच तो गावी परतला था. त्याचे लग्न ७ जुलै रोजी होणार होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी ४ जुलै रोजी सुभाषने नीरजला लग्नापूर्वी पार्टी देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर ते दोघे बिहारमधील जमुई येथे गेले.

दुसरीकडे, उर्मिलानेही नीरजला फोन करून झारखंड-बिहार सीमेवरील बेला जंगलाजवळ भेटायला बोलावले. नीरज तिथे पोहोचला असता, त्याला नशा देण्यात आली. त्यानंतर आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सुभाषने उर्मिलाच्या मदतीने नीरजवर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नीरजचा जागीच मृत्यू झाला.

Crime News:  वन्य प्राण्यांनी मृतदेह खावा म्हणून जंगलात फेकला

हत्या केल्यानंतर दोघांनी नीरजचा मृतदेह जंगलातील एका निर्जन भागात फेकून दिला. जंगलातील हिंस्र आणि वन्य प्राण्यांमुळे मृतदेहाची विल्हेवाट लागेल आणि हत्येचा कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही, असा या दोन्ही आरोपींचा हेतू होता. ५ जुलै रोजी नीरज अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. अखेर शेजारच्या बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यातील बिचकोरवा येथील जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला.

Crime News: आरोपीने गुन्हा कबूल केला

पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयावरून मेहुणा सुभाष हाजराला ताब्यात घेतले. कसून केलेल्या चौकशीदरम्यान त्याने उर्मिलासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले २ चाकू, एक स्कूटी आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेदेखील वाचा

Comments are closed.