ICC Rankings – शुभमन गिल वनडे रँकिंगमध्ये नंबर-1 बनण्याच्या उंबरठ्यावर; अक्षर पटेल, बुमराहचीही मोठी झेप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये वनडे मालिकेला सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 6 विकेटने पराभव केला. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने 75 चेंडूंत 80 धावांची धडाकेबाज खेळी. या खेळीमुळे गिलला 12 रेटिंग गुणांचा फायदा झाला असून गिल आता वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत नंबर-1 बनण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

वनडे फलंदाजांच्या गुणतालिकेत शुभमन गिल 803 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलपेक्षा (814 गुण) 11 गुणांनी मागे आहे. या क्रमवारीत विराट कोहली (757 गुण) तिसऱ्या तर रोहित शर्मा (744 गुण) चौथ्या स्थानावर कायम आहे. इतर खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा शाई होप सहाव्या स्थानावर पोहोचल्याने पाकिस्तानचा बाबर आझम सातव्या क्रमांकावर घसरला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बऱ्याच काळानंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत थेट 24 वे स्थान गाठले आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलनंतरचा हा त्याचा पहिलाच सामना होता, ज्यामध्ये त्याने 9 षटकांत केवळ 31 धावा देऊन इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची विकेट घेतली. दुसरीकडे, इंग्लंडचा जोफ्रा आर्चर चौथ्या स्थानावर घसरला असून दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच न्यूझीलंडचा मिचेल सँटनर सातव्या, तर बांगलादेशचा शरीफुल इस्लाम आणि वेस्ट इंडिजचा गुडाकेश मोती अनुक्रमे 15 व्या आणि 16 व्या स्थानावर पोहोचले आहेत.

FIFA World Cup 2026 – अर्लिंग हालांदने विश्वचषकातून घरी आणला खास ‘सोबती’

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हिंदुस्थानचा अक्षर पटेलने अफाट कामगिरी करत टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत अर्धशतक ठोकण्यासोबतच 4 विकेट्स घेणाऱ्या अक्षरने तीन स्थानांची झेप घेत नववे स्थान पटकावले आहे. अष्टपैलूंच्या या यादीत बांगलादेशचा कर्णधार मेहेदी हसन मिराज दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. फलंदाजीमध्ये झिम्बाब्वेच्या बेन कुरनने बांगलादेशविरुद्ध नाबाद 111 धावा करत तब्बल 31 स्थानांची मोठी झेप घेत 34 वे स्थान मिळवले आहे.

Comments are closed.