14 संघ, अंतिम फेरीसाठी 3 टप्पे, 'सुपर सिरीज'; 2027च्या वन-डे वर्ल्ड कपसाठी आयसीसीचा मास्टर प्लॅन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या २०२७ वनडे वर्ल्ड कपच्या (ODI World Cup 2027) फॉरमॅटमध्ये मोठा बदल केला आहे. आयसीसीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली की, एडिनबर्ग येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) या बदलांना मंजुरी देण्यात आली.
आगामी विश्वचषकात १४ संघ सहभागी होणार आहेत. अंतिम ३ संघांसाठी ‘सुपर सीरिज’चे आयोजन केले जाईल. याशिवाय फायनलमध्ये पोहोचण्यासाठी एकूण तीन फेऱ्या (राउंड्स) असतील. चला तर मग, वनडे वर्ल्ड कपबाबतचे हे सर्व बदल सविस्तरपणे समजून घेऊया.
आयसीसीने सांगितले की, आगामी वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाईल. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघांना ३ फेऱ्यांमधून जावे लागेल.
क्वालिफाय करणाऱ्या १४ संघांपैकी सर्वात तळाचे (शेवटचे) तीन संघ राउंड-रॉबिन ‘सुपर सीरिज’ खेळतील. या सीरिजमधील विजेता संघ पुढील फेरीत आपली जागा निश्चित करेल.
उरलेल्या १२ संघांची प्रत्येकी ६-६ अशा २ ग्रुपमध्ये (गटात) विभागणी केली जाईल. प्रत्येक ग्रुपमध्ये राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये सामने होतील. प्रत्येक ग्रुपमधील टॉप-३ संघ आणि दोन्ही ग्रुपमधील त्यानंतरची सर्वात चांगली रँकिंग असलेला १ संघ, असे मिळून ‘सुपर ७’ स्टेजमध्ये पोहोचतील.
या स्टेजमध्ये ७ संघ राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये एकमेकांविरुद्ध सामने खेळतील, ज्यामधून टॉप-४ संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय करतील. यामध्ये पहिला आणि चौथ्या क्रमांकाच्या संघात पहिली सेमीफायनल होईल, तर दुसरी सेमीफायनल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये खेळवली जाईल.
आगामी २०२८ चा टी-२० वर्ल्ड कप २० संघांसह कायम ठेवला जाईल, जो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे. स्पर्धेचा हा बदललेला फॉरमॅट अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे जेणेकरून स्पर्धेच्या दुसऱ्या स्टेजमध्ये संघांची संख्या वाढवता येईल.
या २० संघांची ५ ग्रुपमध्ये विभागणी केली जाईल. यापूर्वीच्या म्हणजेच २०२६ च्या टी-२० विश्वचषकात २० संघांना ४ ग्रुपमध्ये विभागण्यात आले होते. पाचही ग्रुपमधील टॉप-२ संघ ‘सुपर-१०’ साठी क्वालिफाय करतील. सुपर-१० ग्रुप स्टेजमध्ये संघांची प्रत्येकी ५-५ अशा दोन ग्रुपमध्ये विभागणी केली जाईल, ज्यामध्ये राउंड-रॉबिन फॉरमॅटमध्ये सामने होतील. प्रत्येक सुपर-१० ग्रुपमधील विजेते संघ थेट सेमीफायनलसाठी क्वालिफाय करतील.
सेमीफायनलमधील उर्वरित २ जागा एका नवीन ‘एलिमिनेटर राउंड’द्वारे ठरवल्या जातील, ज्यामध्ये प्रत्येक सुपर-१० ग्रुपमधील दुसऱ्या क्रमांकावर असलेले संघ दुसऱ्या ग्रुपमधील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांचा सामना करतील.
एलिमिनेटर सामने जिंकणारे संघ सेमीफायनलची लाईन-अप पूर्ण करतील, तर सेमीफायनल आणि फायनलचे सामने सध्याच्या फॉरमॅटनुसारच खेळवले जातील.
Comments are closed.