यूकेची व्हिस्की, कार, सौंदर्यप्रसाधने स्वस्त
हिंदुस्थानात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि फुटवेअर आजपासून स्वस्त मिळत आहेत. हिंदुस्थान-यूके यांच्यातील मुक्त व्यापार करार लागू झाल्याने या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. ‘उलटगणती सुरू झाली आहे! यूके आणि हिंदुस्थान यावर सहमत आहेत की, मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू झाला आहे. आधुनिक यूके-हिंदुस्थान भागीदारीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. हे दोन्ही अर्थव्यवस्थांसाठी विकासाच्या एका नवीन युगाची सुरुवात करेल,’ असे यूकेच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे.
Comments are closed.