सकाळी रिकाम्या पोटी प्यावे हे ड्रींक





सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्याने पोट स्वच्छ होतं. असा सल्ला अनेकजण देत असतात. पण फक्त गरम पिण्याऐवजी तुम्ही या ५ पैकी एक जरी ड्रींक प्यायले तरी तुमचे पोट नियमित साफ होते, रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि स्ट्रेसही कमी होतो. त्यामुळे तुमचे शरीर कायम निरोगी राहते. कोणते आहेत हे ड्रींक्स ते बघूया.

लिंबू पाणी
सकाळी उठल्यावर लिंबू पाणी पिल्याने अन्नपचन क्रिया सुधारते. पोट साफ होते. तसेच शरीर हायड्रेटही होते. तसेच लिंबातील व्हिटामीन सीमुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. पण जर तुम्हाल नेहमी गॅसेसचा त्रास होत असेल तर लिंबू पाण्यामुळे तो त्रासही दूर होईल.

जीऱ्याचे पाणी
जर सकाळी उठल्यावर तुमही जीऱ्याचे पाणी पित असाल तर ही उत्तम सवय आहे. कारण जीऱ्यामुळे पाचनशक्ती सुधारते. त्यामुळे गॅस, अपचन, पोट फुगणे यासारख्या समस्या होत नाहीत. अन्न लवकर पचते.

चिया बियाणे
सकाळी उठल्यावर जर तुम्हीही चिया सीड्स पाण्यातून घेत असाल तर वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. चिया सिड्स हायड्रेशनसाठी मदत करते.यात फायबरचे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे बद्धकोष्ठापासून आराम मिळतो.

बडीशोप पाणी
अन्न पचनाबरोबरच , गॅस, पोट फुगणे या समस्यांच्या निराकरणासाठी बडीशोप उत्तम आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर बडीशोपचे पाणी पिल्याने पचनासंबंधी सगळ्याच समस्यांचे समाधान मिळते.

तुळशी
सकाळी उठल्यावर तुळशीचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. ताण कमी होतो. तुळशीतील अँटीऑक्साडेंट आणि फायटोकेमिकल्समुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. तसेच तुळशीतील एडाप्टोजेनमुळे तणाव कमी होतो.



Comments are closed.