सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला राजकीय पाठिंबा; अनेक नेत्यांनी घेतली भेट
नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच परिक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे बाधित झालेल्या लाखो विद्यार्थांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर मैदानावर 28 जून 2026 पासून उपोषण सुरू केले आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20 वा दिवस आहे आणि त्यांच्या प्रकृतीने चिंता वाढवली आहे. कारण सोनम वांगचुक यांचे वजन गेल्या 20 दिवसात तब्बल 9 किलोपेक्षा जास्त कमी झाले आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेते सोनम वांगचुक यांची भेट घेताना दिसत आहेत.
Comments are closed.