कल्याण-डोंबिवलीत दोन तास ब्लॅकआऊट
कल्याण, डोंबिवली शहराला वीजपुरवठा करणारी महत्त्वाची 220 केव्ही पडघा-पाल वीजवाहिनी सायंकाळी ट्रिप झाली. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये तब्बल दोन तास ब्लॅकआऊट झाला. सवा तीन लाख ग्राहकांना त्याचा फटका बसला असून उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
सोनारपाडा, कासा रिओ, कासा बेला, नेतीवली, एपिक, डाउनटाऊन, लेकशोर, उसाटणे आणि लोढा प्रीमियर या उपकेंद्रांवरील वीजपुरवठा पूर्णपणे बंद झाला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक भागांतील लिफ्ट बंद पडल्या, वाहतूक सिग्नलवर परिणाम झाला, तसेच घरगुती आणि व्यावसायिक कामकाजावरही परिणाम झाला. सायंकाळी गर्दीच्या वेळेत वीज गेल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तांत्रिक बिघाड शोधण्याचे काम सुरू केले. उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
Comments are closed.