युद्धाची चर्चा लीक करून 86 हजार कोटी कमावले, ट्रम्प यांच्या जावयाची करामत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका-इराण यांच्यात स्वित्झर्लंडमधील होणारी चर्चा लीक करत डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुश्नर यांनी तब्बल 86 हजार कोटी रुपये कमावले आहे, असा गंभीर आरोप इराणने केला आहे. कुश्नर आणि ट्रम्प यांचे विशेष दूत, स्टीव्ह विटकॉफ यांनी चर्चेतील गोपनीय माहितीचा वापर करून बाजारात फेरफार केल्याचा आरोप इराणने केला आहे. ट्रम्प यांच्या जावयाने 86 हजार कोटींचा नफा कमावला आहे. त्यातील 43 हजार कोटी रुपये इराणला देण्यात यावे, अशी मागणी इराणकडून करण्यात आली आहे. चर्चेदरम्यान अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांना खासगी संदेशातून याची पूर्वसूचना दिली होती, असेही इराणने म्हटले आहे.

Comments are closed.