मोदींना देवाने सद्बुद्धी द्यावी, ते कुणाच्या मरणाची वाट पाहतायत? लेकरू नाही, बायको नाही, कसली द

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील (Delhi) कॉकरोच जनता पार्टीच्या (Cockroach Janata Party) आंदोलनात शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मोठा गोंधळ पाहायला मिळाला. NEET परीक्षेतील कथित फेरफार आणि अनियमिततेच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर इथे उपोषणाला बसलेल्या पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरुन हटवण्यात आलं. तिथून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतर उपस्थित आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता सोनम वांगचुकना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं हटवल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच अभिजीत दीपके यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Abhijeet Dipke Parents: दोन- तीन दिवस त्याचं आमचं बोलणंच झालेलं नाही

दिपकेंच्या आईने एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, दिल्लीमध्ये सोनम वांगचुक यांचं आंदोलन चांगलं आणि शांततेत चालू होतं, आज त्यांना उचलून नेल्यामुळे मग आता तोही आमरण उपोषणला बसलेला आहे तर आम्हाला त्याची चिंता वाटते, आमचं त्याच्याशी कसलंही बोलणं झालं नाही. दोन- तीन दिवस त्याचं आमचं बोलणंच झालेलं नाही. सरकारने असं करायला नव्हतं पाहिजे, चुकीचं केलं, पोर शांततेत आंदोलन पार पाडत होते. 20 तारखेच्या नंतर त्यांना काय डिसिजन घ्यायचं होतं तर घ्यायचा ना, पण सरकारने सध्या असं नव्हतं करायला पाहिजे, आम्ही 20 तारखेचीच वाट बघत होतो, लेकर आता घरी येतील, कधी येतील, एक महिना झालं तो बाहेर आहे, त्याच्याच टेन्शनमध्ये आम्ही पण आहेत, सरकार त्या सर्व विद्यार्थ्यांना का गांभीर्याने घेत नाही ते सरकारला माहिती, काय आहे, काही नाही, असंही अभिजीत दीपकेच्या आईने एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

Abhijeet Dipke Parents: लेकरू नाही, ना बायको नाही, यांना कसली दया, माया काहीच नाही

तर अभिजीत दीपकेच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, आमचं त्याच्यासोबत बोलणं नाही झालं. मागे चार-पाच दिवसापूर्वी बोललो होतो, त्याच्यानंतर बोललं नाही झालं, माझी तब्येत बरोबर नव्हती. वडील म्हणल्यावर कोणालाही आपल्या मुलाची चिंता वाटणारच आहे, तशीच मला देखील वडील म्हणून एक माझ्या मुलाची चिंता वाटते आहे, जो गादीवर बसलेला माणूस जो जिम्मेदार व्यक्ती आहे नरेंद्र मोदी, यांच्याकडे मी थोडी आशा करतो की, त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, जे देशातले विद्यार्थी ठिक-ठिकाणी उपोषणाला बसतायत, म्हणजे ते काय कुणाच्या मरणाची वाट पाहता आहेत का? किती जणांनी जीव द्यावा यांच्यासाठी, यांना तर लेकरू नाही, ना बायको नाही, यांना कसली दया, माया काहीच नाही. मी देवाजवळ प्रार्थना करतो की, हा जर माणूस असेल. नरेंद्र मोदी जर माणूस असेल, माणूस या प्राणी गटातला असेल, तर त्याला देवाने सुदबुद्धी द्यावी की, त्या विद्यार्थ्यांच बोलणं त्यांनी ऐकून घ्यावं, आम्ही पण मुलासोबत उपोषणाला बसणार आहे, तिथे आम्ही दोघे पण जाणार आहे.  परत मी सांगतो मोदी जर माणूस असेल, मनुष्य प्राणी या पृथ्वी पृथ्वीतलावर जेवढे जीव असतात, त्याच्यामध्ये एक आहे, मनुष्य प्राणी आणि तो सर्वात बुद्धिमान आहे, विचार करू करू शकतो, तो योग्य निर्णय घेऊ शकतो, तो जर माणूस असेल तर त्याला देवाने सद्बुद्धी द्यावी, नाहीतर त्यांनी स्वतःला मनुष्य म्हणून घेऊ नये. माझं हे म्हणणं आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Abhijeet Dipke Parents: डोक्यामध्ये सत्तेची धुंदी चढलेली आहे, हिटलर सारखी…

माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यांना देखील कळायला पाहिजे, हे विद्यार्थी काय पाकिस्तानमधले आहेत का? दुसऱ्या देशातले विद्यार्थी आहेत का? भारतीय विद्यार्थी आहेत, एवढे निर्दयी या व्यक्तीने वागू नये, यांच्या डोक्यामध्ये सत्तेची धुंदी चढलेली आहे. हिटलर सारखी त्याच्या डोक्यात धुंदी चढलेली आहे, ती धुंदी उतरेल त्याची. लोकशाही मार्गानेच ती धुंदी उतरेल. काय माझं कोणी नीटमध्ये नाहीये, माझी मुलगी नाहीये, माझ्या मुलाने नीट परीक्षा दिलेली नाहीये, आणि हा जे ज्यांनी कोणी आत्महत्या केलेल्या आहेत, ते पण माझ्या कुठल्या, आमच्या नातेवाईकातील नाहीत किंवा विशेष आता जातीवर किंवा धर्मावर घेऊ नये पण आमच्या समाजाचे सुद्धा नाहीत कोणी त्याच्यामध्ये नसतील, असतील मी तेवढं खोलमध्ये जात नाही. मला जायचं देखील नाही जाती धर्मावरती, पण ह्या नरेंद्र मोदीला परमेश्वराने अक्कल द्यावी आणि त्या मुलांचं काय म्हणणं आहे, ते ऐकावं ही माझी प्रतिक्रिया आहे, ती त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवा, असंही पुढे दिपकेच्या वडिलांनी म्हटलं आहे.

Abhijeet Dipke Parents: आम्ही पण त्याच्यासोबत जाणार आणि उपोषणाला बसणार

तर आईने म्हटलं की, आम्ही पण त्याच्यासोबत जाणार आणि उपोषणाला बसणार आहे. त्याच्या काय घरातलं कोणी नाहीये, चला बाबा त्याच्या घरातले त्याचे भाऊ, बहीण, चुलते कोणी नीटची परिक्षा दिली असती, त्यांचे लेकर असते, तर आम्ही म्हटलं असतं, त्याचं कोणीच परिक्षेला बसलेलं नाहीये, ना त्याचं लग्न झालेलं आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिपकेंच्या आई वडिलांनी दिली आहे.

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

हेदेखील वाचा

Comments are closed.