आषाढी एकादशीच्या उपवासासाठी १५ मिनिटांत बनवा खास गूळ-शेंगदाण्याचे लाडू! झटपट रेसिपी लक्षात घ्या

25 जुलैला आषाढी एकादशी आहे. या दिवशी सर्व स्त्री-पुरुष उपवास करतात. उपवास केल्यानंतर खाण्यापिण्यात अनेक बदल करावे लागतात. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, वडे, थालीपीठ, बटाट्याची भाजी असे काही पदार्थ खाल्ले जातात. पण तेलकट पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त किंवा अपचन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवासानंतर नेहमी हलका आहार घ्या. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शेंगदाणा गुळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू भरपूर प्रमाणात पोषक असतात. उपवासाच्या दिवशी सात्त्विक आहार घेणे विशेषतः महत्वाचे आहे. त्यामुळे कोणतेही चुकीचे पदार्थ खाऊन अपचन वाढवण्यापेक्षा हलका आणि पौष्टिक आहार घ्या. चला तर मग जाणून घेऊया शेंगदाणा गुळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(छायाचित्र सौजन्य – पिंटरेस्ट)
साखर नाही, गूळ नाही! चवीनुसार अजूनही अप्रतिम; हेल्दी शुगर फ्री लाडू घरीच बनवा
साहित्य:
- गूळ
- शेंगदाणे
- वेलची पावडर
- तूप
मान्सून टिप्स: पावसाळ्यात गर्भधारणेचे नियोजन? मग, फॉलिक ॲसिड घ्यायला विसरू नका
कृती:
- गुळाचे शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या. शेंगदाणे मंद आचेवर लाल होईपर्यंत सतत भाजून घ्या.
- भाजलेले शेंगदाणे थंड होण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये काढा. त्यानंतर साल काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घट्ट वाटून घ्या.
- शेंगदाण्याची घट्ट पेस्ट काढून त्यात किसलेला गूळ घालून मिक्स करा.
- नंतर त्यात वेलची पूड घालून मिक्स करा. पौष्टिक चवीचे लाडू महिनाभर चांगले टिकतात.
- तयार मिश्रणात गरम केलेले तूप घालून एक लाडू बांधून घ्या. सोप्या पद्धतीने बनवलेले पौष्टिक शेंगदाणा गुळाचे लाडू तयार आहेत.
- उपवासाच्या दिवशी साबुदाणा किंवा बटाटा खाण्याऐवजी शेंगदाणा गुळाचे लाडू खा. यामुळे पोटही भरलेले राहते आणि शरीरालाही फायदा होतो.
Comments are closed.