आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच संदेश सरकारला द्यायचा आहे का? रोहित पवार यांचा संताप
दिल्ली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना जंतरमंतर येथील आंदोलन स्थळावरून बळजबरीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे. या कारवाईमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच संदेश सरकारला द्यायचा आहे का? रोहित पवार यांचा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून मागे हटत नाही हे पाहताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केले, असा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच संदेश सरकारला द्यायचा आहे का, अशी सवालही त्यांनी उपस्थित केला.
एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचाय? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 18 जुलै 2026
पुढे लिहीताना रोहित पवार यांनी सरकारला थेट आव्हान दिले की, आंदोलन करणाऱ्यांवर अशी जबरदस्ती करण्यापेक्षा सरकार निष्क्रिय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? तसेच केंद्र सरकारचा हा वाढता अहंकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Comments are closed.