मंत्रिमंडळाची आज तातडीची बैठक.

जिल्हाधिकारी, जि. पं. सीईओंशी देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा

टी. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, मान्सून, पिण्याचे पाणी यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर रविवारी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी  मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी बेंगळुरातील विधानसौध येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. रविवारी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली आहे. तत्पूर्वी दुष्काळी परिस्थितीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले.

पावसाच्या परिस्थितीबाबत केंद्राला माहिती

पावसाळ्यात कोणत्या पूरक उपाययोजना करता येतील आणि दुष्काळ पडल्यावर लोक मोठ्या संख्येने स्थलांतर करत असल्याची माहिती राज्य सरकारला मिळाली आहे. ही समस्या टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा केली जाईल. या संदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठविले असून, पावसाच्या प्रमाणासह अनेक माहिती आणि आकडेवारी केंद्र सरकारला सादर केली जाईल, असे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

जलाशय भरल्यानंतर शेतीसाठी पाणी

राज्यातील विविध जिल्ह्यांना परिस्थितीनुसार पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे. मंड्या आणि इतर कोणताही जिल्हा जलाशयांतील पाणी शेतीसाठी वापरू शकत नाही. जलाशयांमधील पाणीसाठा तपासल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, शेतीसाठी पिण्याचे पाणी वापरून नंतर पेरणी, लागवड इत्यादींसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारवर दबाव आणू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

 

Comments are closed.